२. रस्त्यावरील कर्कश आवाजामुळे (गोंगाटामुळे)अभ्यासात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल पोलिस खात्याकडे एक
तक्रार नोंदवा.(तक्रार पत्र)
Answers
पत्र लेखन
Explanation:
रोहन नाईक,
१०१, कृष्ण सोसायटी,
रामनगर,
सांगली.
दिनांक: १३ नोव्हेंबर,२०२१
प्रति,
माननीय पोलिस अधिकारी,
रामनगर पोलिस स्टेशन,
सांगली.
विषय: कर्कश आवाजामुळे (गोंगाटामुळे)अभ्यासात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल तक्रार पत्र
महोदय,
मी, रोहन नाईक, रामनगरचा रहिवाशी आहे. या पत्रातून मला तुम्हाला आमच्या विभागात रस्त्यावरील कर्कश आवाजामुळे अभ्यासात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल सांगायचे आहे.
आमचा विभाग मार्केटच्या जवळ असल्यामुळे गाड्यांचे व लोकांचे येणे जाणे इथे सतत चालू असते. त्यामुळे इथे दिवसभर गोंगाट होत असतो.
त्यासोबतच आता इथे नवीन टॉवरचा बांधकाम सुरु झाले आहे, त्यामुळे मशीनचा कर्कश आवाज येत असतो.
या गोंगाटामुळे मला व माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय होते. आम्ही नीट लक्षपूर्वक अभ्यास करू शकत नाही. महत्वाचे धडे पाठ करताना अडथळा येतात.
मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे कर्कश आवाज कमी करण्यासाठी योग्य तो उपाय करा.
आपला कृपाभिलाषी,
रोहन.
Answer:
nice letter interested