रविवार ची सुट्टी नसती तर.......,मराठी निबंध१००ते१५०शब्दात
Answers
Answer is directly given in the picture
■■ रविवारची सुट्टी नसती तर!■■
रविवार हा सगळ्यांचा आवडता वार असून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण आवर्जून रविवारची वाट पाहतात. रविवारच्या सुट्टीला काय करावे याची प्लानिंग आपण आधीपासूच करून ठेवतो.
तेव्हा,रविवारची सुट्टी नसती तर, हा विचारच मनात भीती निर्माण करतो. रविवारची सुट्टी नसती तर,आठवड्यातले सगळेच दिवस एकसारखे वाटतील. आपल्याला रविवारी आपल्या कुटुंबासोबत, मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाता येणार नाही. सकाळी उशिरा उठता येणार नाही. आरामात आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवता येणार नाही.
आठवड्याचे सात दिवस काम करत राहिल्यामुळे, आपण खूप थकून जाऊ. शरीर थाकल्यामुळे आजारी पडण्याची भीती वाढेल. स्वतः साठी नीट वेळ मिळत नसल्यामुळे आपण कंटाळून जाऊ. आपला ताण वाढेल. याचा परिणाम आपल्या कामावर दिसू लागेल.
तेव्हा,रविवारची सुट्टी नसती तर, लोकांना फार त्रास होईल त्यामुळे रविवारची सुट्टी ही हवीच.