World Languages, asked by sanashaikh2133, 12 hours ago

सुचनाफलक तयार करा। (५) पाणी पुरवठा​

Answers

Answered by aniketkumbhar063
3

Answer:

plese give me brineless ans and following me

Explanation:

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाब नलिकेतून पाण्याची गळती होत आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी दहानंतर पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड भागातील संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने व विस्कळित होईल, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

पालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाब नलिकेतून पाण्याची गळती होत आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी सकाळी दहानंतर टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाब नलिकेचे पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड, बिजलीनगर, पिंपरीनगर, पिंपरी गाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी या भागातील संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने व विस्कळित होईल. गळतीची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापलिकेने केले आहे.

Similar questions