सागरी हवामानामुळे किनारपट्टीच्या तापमानात कसा बदल होतो
Answers
भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे ६ मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात त्यात अंदमान मध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरीत जंगलांपासुन ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासुन ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाइन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटाचा समावेश होतो. परंतु या वैविध्यतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मौसमी वारे व त्यानी येणारा पाउस ज्यावर संपूर्ण भारत, खासकरुन शेती उद्योग अवलंबुन आहे. भारतात ढोबळमानाने ४ ऋतु आढळून येतात. मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे).
भारतीय हवामानात वैविध्यता येण्यास मुख्यत्वे येथील भौगोलिक परिस्थिती जवाबदार आहे व हवामानाचे संपूर्ण नियंत्रण हे उत्तरेतील हिमालय व पश्चिमेतील थरच्या वाळवंटामुळे होते. हिमालय मुख्यत्वे उत्तरेकडून गोबीच्या वाळवंटाकडून येणारे जबरदस्त थंड वारे रोखुन धरतो व थरचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातू व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो. यामुळे भारताचे एकुणच हवामान वर्षभर गरमच असते. तसेच कर्कवृत हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला तसे विषुववृतिय देशातच धरले जाते. इतर विषुववृतिय देशांप्रमाणे भारतात देखील हवामानात टोकाचे बदल होउ शकतात. खूप पाउस, प्रचंड दुष्काळ, चक्रिवादळे, पुर व इतर नैसर्गिक आपत्तिंचा या देशाला बरेचदा सामना करावा लागतो.
वर नमुद केल्या प्रमाणे भौगोलिक परिस्थितीचा भारतीय हवामान वैविध्यपुर्ण होण्यात खूप वाटा आहे. भारतीय हवामान हे हिमालय तसेच पश्चिमेला हिंदुकुश पर्वत व थारच्या वाळवंटाने मुख्यत्वे नियंत्रित होते. हे पर्वत उत्तरेकडुन येणारे थंड वारे रोखुन धरतात व थारचे वाळवंट हे दक्षिणेतील हिंद महासागरातुन व अरबी समुद्रातुन बाष्पयुक्त वारे आकर्षित करतो जे जुन ते सप्टेंबर या महिन्यात भारताच्या बहुतेक भागात पाउस पाडतात. भारताच्या सर्व भागात पावसाचे प्रमाण हे असमतोल आहे. यात मुख्यत्वे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा मोठा वाटा आहे. भारतात पावसाच्या प्रमाणानुसार सात मुख्य हवामानाचे झोन आहेत. व त्यांची वर्गवारी पडणारा पाऊस तापमान यावर केली आहे.
विषववृतिय आंद्र प्रदेश- यात मुख्यत्वे भारतातील दमट प्रदेश येतो. ज्या प्रदेशात पावसाळ्याच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व इतर वेळ हवामान दमट राहाते अश्या भागांचा यात समावेश होतो. यात मुख्यत्वे भारतातील कोकण किनारपट्टी, सह्याद्री आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, लक्षद्वीप व अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश होतो. येथे साधारणपणे वर्षभर आद्रतेमुळे येथील तापमान केव्हाही जास्तच असते परंतु आद्रतेमुळे अतिउन्हाळा पण येथे अनुभवायास मिळत नाही. तापमान १८-३५ अंश सेल्सिअस यामध्येच असते परंतु उन्हाळ्यामध्ये कधी कधी अतिदमट हवे मुळे येथील जीवन सवय नसणाऱ्यांना असह्य होते. पाऊस फक्त पावसाळ्यातच होतो पण प्रचंड होतो. येथील सरासरी पावसाचे प्रमाण वार्षिक २००० मीमी इतके आहे. मेघालयमधील चेरापुंजी येथे जगातील सर्वात जास्त पाऊस होतो. जुलै २६, २००५ रोजी मुंबई मध्ये एका दिवसात १००० मीमी पेक्षा जास्त पाऊस पडला ही मानवी इतिहासातील सर्वात जास्त पाऊस पडल्याची घटना आहे. पाऊस मे ते नोव्हेबर या दरम्यान होतो. डिसेंबर ते मार्च हे महिने शुष्क असतात. पावसाचे सर्वाधिक प्रमाण जुलै महिन्यात अनुभवायास मिळते व सप्टेंबर पर्यंत नियमितपणे पाऊस पडतो. ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात मुख्यत्वे परतीचे मौसमी वाऱ्यामुळे अनियमितपणे पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे येथे सदाहरीत जंगले आहेत. या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैव वैविध्य आढळून येते.
विषववृतीय शुष्क प्रदेश- भारताच्या दख्खनच्या पठारावर तसेच सह्याद्रीच्या पुर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. याचे मुख्य कारण म्हणजे सह्याद्री मौसमी वारे काही प्रमाणात अडवुन धरतो व सह्याद्री ओलांडल्यानंतर काही वेळ हे वारे जास्त उंचीवरुन वाहतात परिणामी पाऊस जमीनी वर पोहोचण्यात असमर्थ ठरतो. यालाच पर्जन्यछाया असे म्हणतात. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्याचा बहुतेक भाग शुष्क आहे. येथील तापमानात आंद्र प्रदेशापेक्षा जास्त प्रमाणात बदल होताना दिसतो. उन्हाळे अतिशय कडक असतात तापमान ४० - ४४ अंश सेल्सियस पर्यंत जाउ शकते तसेच विषवृताजवळ असल्याने हिवाळा फारसा कडक नसतो परंतु काही दख्खन पठाराच्या उत्तर भागात हिवाळ्यात रात्री तापमान १० अंशापर्यंत खाली जाऊ शकते. हा भाग शुष्क असला तरी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वाहणाऱ्या परतीच्या मौसमी वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरातले बाष्प भारतीय द्विपकल्पात आकर्षित होते व द्विपकल्पीय शुष्क भागात पाउस पाडतात. खासकरुन तमिळनाडू व आंध्र प्रदेशात हा पाउस मोठ्या प्रमाणावर पडतो. पावसाबरोबर या दिवसात चक्री वादळाचे दर वर्षी एखाद दुसरे आक्रमण या भागात होते. ह्या भागाचे तीन उपविभाग पडतात समशुष्क शुष्क व ,अतिशुष्क
पहिल्या समशुष्क विभागात मुख्यत्वे द्विपकल्पीय शुष्क प्रदेशाचा म्हणजे पश्चिम व मध्य महाराष्ट्राचा तसेच मध्य कर्नाटक पुर्व आंध्र प्रदेश व तमिळनाडूचा बहुतेक भूभाग येतो. येथील पावसाचे एकुण प्रमाण ४००- ७०० मी.मी इतके असते परंतु हा भाग दुष्काळ प्रवण आहे. कमी मौसमी पाऊस किंवा परतीच्या मौसमी पाऊस किंवा परतीच्या मौसमी पावसाचा अभाव हे येथील दुष्काळप्रवणाचे मुख्य कारण आहे व सिंचन प्रकल्पांअभावी येथे शेती करणे अतिशय कठीण काम आहे.