Hindi, asked by mishranandini55, 20 hours ago

सिंह , कोल्हा व कुत्रा मंत्रा - सवाना मिळून शिकार - सारखा वाटणा - हारणाचा शिकार - सिंहाची युक्ती - तीनही वाटे लुबाडतो - कुत्रा व कोल्हा उपाशी . write a nibhand including this words​

Answers

Answered by ajitdhanshri1234
13

Answer:

Explanation:

एका रानात एक सिंह, एक कुत्रा व कोल्हा या तिघांमध्ये आपापसात करार झाला की, तिघांनी मिळून रानात जाऊन शिकार करावी व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यावे. याप्रमाणे ठराव करून ते शिकारीस गेले व तेथे मोठा धष्टपुष्ट हरीण त्यांनी मारला. त्या हरीणाचे तीन भाग करण्यास सिंहाने कुत्र्याला सांगितले. त्याप्रमाणे कुत्र्याने हरीणाचे तीन सारखे भाग केले. ते पाहून सिंहाला इतका राग आला की, त्याने एका क्षणात आपल्या पंजाने कुत्र्यावर वार केला. नंतर कोल्ह्याला तो म्हणाला, 'अरे, आता या शिकारीचे तू भाग कर.' कोल्हा मुळातच धोरणी. त्याने त्या हरीणाच्या मांसाचा एक लहानसा तुकडा तोडून घेतला व उरलेले सगळे मांस सिंहाच्या स्वाधीन करून त्याला म्हटले, 'सरकार मला एवढंच पुरे, बाकी उरलेला सर्व भाग आपणच घ्या.' हे त्याचे चातुर्य पाहून सिंहाला समाधान वाटले. मग तो त्याला विचारू लागला, 'अरे, हा संभावितपणा तुला कोणी शिकवला?' कोल्हा लगेच म्हणाला, 'सरकार, खरं सांगाल तर आपल्यापुढे जखमी पडलेल्या कुत्र्यानेच मला हे शिकवलं !' कुत्र्याने विचार केला की कोल्हा आपला मित्र आहे. त्याला मिळालेला लहान तुकडा आपण वाटून खाऊ. पण कोल्हा ते करायला तयारच नव्हता या दोघांच्या भांडणाचा फायदा घेत सिंहाने कोल्ह्याला मिळालेला छोटा तुकडा पण पळवला आणि तिथून फरार झाला. कुत्रा आणि कोल्हा हा उपाशीच राहिले. पण त्यांचे भांडण काही थांबले नाही.

Similar questions