सोह शब्दाचा मारा केला।विठ्ठल काकुलती आला।। या ओळीतील विचार स्पष्ट करा
Answers
Answer:
या वाक्यात भक्तने विठठलाला खुप बोलुं त्याच्यावर श्ब्दचा मरा केला. म्हणून विठोबा कळकळीने धाऊन भक्तच्या मदतिला आला.
Answer:
वरील ओळी या संत जनाबाई यांच्या धरीला पंढरीचा चोर या अभंग वाणीतील आहेत.
संत जनाबाईंचे विठ्ठला बद्दलचे असणारे प्रेम त्यांच्या अभंगातून दिसते. विठ्ठलावर त्यांची असणारी श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी शब्दांचा वापर केलेला आहे.
त्यांची विठ्ठलावर एवढी श्रद्धा आहे की त्यांना असे वाटते विठ्ठल आणि त्यांच्यात सामावून जावे. विठ्ठलाने आपल्यापासून लांब जाऊ नये यासाठी अहंम भावाने विठ्ठलावर शब्दाचा मारा करतात. हे पाहून विठ्ठल देखील काकुळतीला येतो आणि संत जनाबाई ना म्हणतो, की अशा शब्दांचा मारा करणे थांबव, मी तुझ्या ह्रदयातच कायम राहील असे आश्वासन परमेश्वर संत जनाबाईंना देतात.
परमेश्वराबद्दल असणारी अमाप श्रद्धा आणि प्रेम जनाबाईच्या अभंगाच्या माध्यमातून दिसते.