India Languages, asked by ghanshyamnair96, 16 days ago

साहस आणि चातुर्य कशाला हवे ?' in Marathi Speech.​

Answers

Answered by OLilyBlinkO
1

Answer:

गिर्यारोहण आयोजन

गिर्यारोहण आयोजनगिर्यारोहण चार भिंतीच्या प्रशिक्षण शाळेत शिकविता येत नाही. प्रशिक्षण शाळेत गिर्यारोहण खेळाचे तंत्र व त्यातील तांत्रिक साधने यांचे ज्ञान प्रशिक्षणार्थींना देता येते. परंतु गिर्यारोहण व इतर सर्व साहसी खेळाचे खरे प्रशिक्षण हे प्रत्यक्ष निसर्गाकडूनच मिळते. कारण निर्सगाची आव्हाने, त्या आव्हानात असलेली जोखीम आणि ती जोखीम तोलून-मापून स्वीकारून निसर्गाच्या त्या आव्हानाला सामोरे जाणे हेच साहसी खेळाचे मर्म आहे. त्यामुळे साहसी खेळात प्रत्यक्ष अनुभव अत्यंत महत्वाचा. जितका अनुभव जास्त तेवढे निसर्गाच्या विविधांगी रूपांचे ज्ञान जास्त. या अनुभवातूनच निसर्गाचे आव्हान स्वीकारण्यात असलेल्या विविधांगी जोखमींचे योग्य पूर्व अनुमान करण्याचे कौशल्य प्राप्त होते. काही प्रसंगी पूर्व अनुमान चुकतात देखील. निर्सगाचे रूप खूपच अनपेक्षितपणे बदलते. अशा वेळी केवळ आणि केवळ अनुभवी व्यक्तीच त्याच्या बरोबर असलेल्या इतरांसह त्या कठीण आव्हानाला यशस्वी व सुखरूपपणे सामोरे जाऊ शकते.

या सर्वांमुळेच गिर्यारोहण व इतर साहसी खेळात जास्तीत जास्त लोकांना सामील करावयाचे असेल, त्यातून साहसी पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करावयाचा असेल, तर त्यासाठी आधी तो साहसी खेळ पूर्ण विकसित करावयास हवा. कारण गिर्यारोहण व इतर साहसी क्रीडा संस्था हेच साहसी क्रीडा प्रकाराची वाढ व प्रसार करण्याचे योग्य माध्यम आहे. गिर्यारोहण संस्थामध्ये विविध प्रकारचा अनुभव असलेल्या व्यक्ती एकत्रितपणे काम करतात. त्यामुळे नवख्या व्यक्तीला त्यांच्याकडून शिकता येते. त्यांच्याबरोबरीने विविध गिर्यारोहण मोहिमात सहभागी होऊन अनुभवाची शिदोरी जमा करता येते. आणि कालांतराने त्याच संस्थेत मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधीही मिळते. या सर्वातून निसर्गाचा आदर, गिर्यारोहणातील जोखीम, इतर सहभागींची सुरक्षा, त्यांच्या जबाबदारीची जाणीव, आर्थिक लाभाच्या पलीकडे जाऊन कर्तव्यपूर्ततेची भावना इ. संस्कार हे गिर्यारोहण संस्थेतच होतात. अशा प्रकारचे संस्कार आणि अनुभव यातून घडलेली व्यक्ती ही नवख्या व्यक्तीची जोखीम घेऊन त्यास यशस्वीपणे साहसी खेळाची अनुभूती देऊ शकतो. त्यामुळे संस्था उपक्रमात अपघातांचे प्रमाण नगण्य आहे. कारण योग्य तयारी व प्रत्येक सदस्याच्या क्षमतेनुसार त्याच्यावर जबादारी टाकण्याची पद्धती.

Explanation:

Hope this helps and pls mark me as brainlist purple you thanks 。◕‿◕。。◕‿◕。 जय मराठा

Similar questions