History, asked by palvekrushna9699, 18 days ago


सुकुमार सेन यांच्या विषयी माहिती सांगा​

Answers

Answered by namrtamahule05
0

Answer:

सुकुमार सेन (जन्म: इ.स. १८८९; मृत्यू: इ.स. १९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती.

सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन यांना सुवर्णपदक मिळाले.

सन १९२१ मध्ये ते भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल झाले. सुरुवातीला त्यांना अनेक जिल्ह्यांत डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे ते बंगाल प्रांताचे मुख्य सचिव झाले. तेथूनच त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांच्यावर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या काळात सन १९५२ ची आणि सन १९५७ ची अशा दोन सार्वत्रिक निवडणुका झाल्या. निवृत्तीनंतर सुकुमार सेन इ.स. १९६० मध्ये पश्चिम बंगालमधील वर्धमान (बर्दवान) विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

सुकुमार सेन हे भारताव्यतिरिक्त सुदानचेही निवडणूक आयुक्त होते.

सुकुमार सेन यांचे बंधू अशककुमार सेन हे भारताचे कायदेमंत्री होते.

Explanation:

hope you like this answer

Similar questions