संकल्पना स्पष्ट करा: मिश्र अर्थव्यवस्था
Answers
Answered by
50
मिश्र अर्थव्यवस्था
मिश्र अर्थव्यवस्था : जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खाजगी भांडवलशाही स्वरूपाची नसून, जिच्यात त्या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते, अशी अर्थव्यवस्था. प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. अलीकडे विकास पावत असलेल्या सहकारी क्षेत्राचा समावेश यात केल्यास हा एक त्रिवेणीसंगम आहे असे आढळून येईल.

45
★ उत्तर - मिश्र अर्थव्यवस्था: ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग शासकीय मालकीचे असतात, तर काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात; त्या अर्थव्यवस्थेस 'मिश्र अर्थव्यवस्था' असे म्हणतात.आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा 'मिश्र अर्थव्यवस्थे'ला भारताने प्राधान्य दिले.मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा,नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो.
धन्यवाद..
Similar questions