Art, asked by bawanekhandeshvar, 8 days ago

'सामाजिक संकेतस्थळावरील संवाद' याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा.​

Answers

Answered by ketankunal73
14

Answer:

प्रस्थापित समाजाने सामूहिक रीत्या स्वीकारलेली आणि प्रत्यक्षात आचरणात आणलेली व्यक्तीच्या बहिर्गत वर्तनाबाबतची व कृतीबाबतची आचारसंहिता म्हणजे सामाजिक संकेत होत. ही आचारसंहिता नियंत्रणात्मक असून व्यक्तीच्या व समूहाच्या सामाजिक बहिर्गत आचारविचारांवर नियंत्रण ठेवण्याचा ती प्रयत्न करते. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सामाजिक संकेतांची गरज असते. सामाजिक संकेतांच्या उदयविस्ताराचा पूर्वेतिहास नेमकेपणाने अवगत नसला, तरी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक मूल्यांतून ते उत्क्रांत होत आलेले असतात. त्यामुळे वेगवेगळ्या समाजांतील सामाजिक संकेतांचे स्वरूपही वेगवेगळे असते. सामाजिक व सांस्कृतिक वारसा टिकविणे, हे सामाजिक संकेतांचे उद्दिष्ट असते.

सामाजिक संघटन, स्वास्थ्य व सुरक्षितता टिकविण्याची जबाबदारी समाजाच्या सर्व थरांतील लोकांवर असते. रूढी, प्रथा व परंपरा यांचेही स्वरूप अलिखित सामाजिक नियमांवर आधारलेले असले, तरी त्यांचा संबंध जुन्या आचारविचारांशी असतो. बदलत्या काळानुसार व परिस्थिती प्रमाणे नव्या आचारविचारांना सामावून घेण्याचा प्रयत्न रूढी, प्रथा व परंपरा करीत नाहीत; त्यामुळे जुन्या व नव्या आचारविचारांत नेहमीच संघर्ष घडून येतो. अशा या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संकेतांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. सामाजिक संकेत बदलत्या काळानुसार व परिस्थितीप्रमाणे नव्या आचारविचारांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने जुन्या व नव्या आचारविचारांत होणारा संघर्ष टळू शकतो. सामाजिक संकेतांचे स्वरूप गतिशील व लवचीक असते. त्यामुळे सामाजिक ऐक्य, संघटन व सातत्य टिकविण्यात त्यांची अधिक मदत होते.

यंत्रणा:

सामाजिक संकेत राबवून घेण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट यंत्रणा अस्तित्वात नसली, तरी त्यांना सामाजिक शक्तीचे (फोर्स) पाठबळ प्राप्त झालेले असते. सामाजिक संकेतांचा आशयव्यक्ती, समूह व समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांशी निगडित असतो. सामाजिक संतुलन व एकता प्रस्थापित करण्यामध्ये सामाजिक संकेतांचा संबंध असला, तरी या बाबतीतील यशापयश हे समाजाची जागरूकता, लोकसंख्येचे आकारमान, समुदाय-भावना तसेच व्यक्ती व समाज यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांवर अवलंबून असते.

सामान्यत: समाजाचे आकारमान जितके लहान असते, तितक्या अधिक प्रमाणात समाज प्रत्येक व्यक्तीकडून सामाजिक संकेतांचे पालन करवून घेण्यात यशस्वी ठरतो. सामाजिक संकेतपालन करण्याची प्रवृत्ती समाजाच्या दबावामुळेच निर्माण होते. आदिम तसेच ग्रामीण समाजांत संकेतपालन अधिक काटेकोरपणे करण्यात येते. आधुनिक काळातील दळणवळणाच्या साधनांमुळे, व्यक्तिवादी दृष्टिकोनामुळे तसेच व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रभावामुळे व्यक्ती व समाज यांच्यातील संबंध औपचारिक, जुजबी व दुय्यम प्रतीचे बनू लागले आहेत. त्यामुळे सामाजिक संकेतपालन करण्याची प्रवृत्तीही कमी झाल्याचे दिसते.

समाजजीवनाच्या आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, औदयोगिक, व्यावसायिक इ. अनेक क्षेत्रांत वेगवेगळ्या स्वरूपाचे संकेत आढळून येतात. विशिष्ट क्षेत्रात संकेतांना विशिष्ट आशय व संदर्भ प्राप्त झालेले असतात. सामाजिक संकेतांचे स्वरूप समाजविशिष्ट व कालविशिष्ट असल्याने, त्यांत सार्वत्रिक सारखेपणा क्वचितच आढळतो; तथापि सामाजिक ऐक्य व संरक्षण हे संकेतांचे उद्दिष्ट सार्वत्रिक व समान आहे.

आधुनिक काळात लोकशाही प्रधान समाजव्यवस्थेत सामाजिक व राजकीय संकेतांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजकीय अथवा कायदेशीर नियामकांना सामाजिक संकेतांचे अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास, ती नियामके अधिक यशस्वी ठरतात.

hope it will help you...

plz mark as brainlliest..!

Answered by SushmitaAhluwalia
13

'सोशल नेटवर्किंग साइट्सवरील कम्युनिकेशन' वरील दृश्ये

  • सोशल मीडिया म्हणजे जिथे आपण पोस्ट करू शकतो, शोधू शकतो, बोलू शकतो आणि इतरांशी संबद्ध होऊ शकतो.
  • इतरांशी बोलणे ही एक रणनीती आहे. हे तुम्हाला इतर दूरच्या व्यक्तींशी संबद्ध आणि संपर्कात राहण्याची परवानगी देते.
  • ग्रहावरील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या इंटरनेट आधारित जीवन टप्प्यांचा वापर करते.
  • लोकांमध्ये ऑनलाइन जीवनाचा ताप अलीकडे आणि वेगाने विकसित झाला आहे.
  • तुमच्या व्यवसायाच्या आणि वस्तूंच्या प्रचारासाठी सोशल मीडिया हा एक उत्कृष्ट टप्पा आहे.
  • सोशल मीडियाचा अतिरेकी वापर असुरक्षित आहे.
  • सोशल मीडिया उपयुक्त आहे कारण तो आम्हाला आमच्या काढून टाकलेल्या कुटुंबातील सदस्यांपासून फक्त एका टॅपमध्ये जोडू शकतो.
  • सोशल मीडिया आता शिकण्याचा एक अविश्वसनीय टप्पा बनला आहे.
  • सोशल मीडिया व्यसनाधीन असू शकतो.
  • पण जर आपण त्याचा हुशारीने उपयोग केला तर ते आपल्या शिक्षणाला चालना देऊ शकते.
Similar questions