४) साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे
Answers
Answer:
साम्राज्यवादाची विविध रूपे
राजकीय गुलामगिरी लादणे, एखाद्या देशाला संरक्षण देउ करणे, व्यापारी करार परक्या देशांच्या गळी उतरवणे, स्वत:ची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे आणि जेथे शक्य असेल तेथे फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करणे यांचा समावेश होता.
Answer:
साम्राज्यवादाच्या वाढीसाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत ती खालील प्रमाणे -
1.अनेक संशोधकांनी नवनवीन शोध लावल्यामुळे मानवाचे आयुष्य गतिमान झाले. लोखंड, बाष्प शक्ती, विद्युतशक्ती, कोळसा या शोधामुळे वाहतूक व दळणवळणामध्ये प्रगती झाली. गोष्टींमुळे साम्राज्यवाद वाढू लागला.
2.विज्ञानातील शोधामुळे मनुष्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यामुळे दुसऱ्या राष्ट्रांमध्ये साम्राज्यवाद वाढू लागला.
3.यंत्रांमुळे उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे तयार केलेल्या मालाच्या उत्पादनात सुद्धा वाढ झाली. तयार झालेल्या मालाची दुसऱ्या देशात विक्री करणे अशक्य झाले. हे कारण साम्राज्यवाद वाढण्यासाठी कारणीभूत ठरले
4. उत्पादनात वाढ होण्यासाठी औद्योगिक क्रांती महत्त्वपूर्ण ठरली. कच्चामाल मिळवण्यासाठी यूरोपीय राष्ट्रांचा कल आशिया व आफ्रिका खंडाकडे वळला. त्यामुळे साम्राज्यवाद वाढला
5. आशिया आणि आफ्रिका खंडाकडे वळण्याचा युरोपियन राष्ट्रांचा एकच उद्देश होता ही राष्ट्रीय नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न होती.
6. युरोपात नवीन राष्ट्रे उदयास आल्यामुळे राष्ट्रीय साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे ठरली.
7. धर्माचा प्रसार व्हावा यासाठी अनेक मिशन स्थापन करण्यात आले. हे साम्राज्यवादाच्या वाढीसाठी कारणीभूत होते.