India Languages, asked by whitedevil2116, 10 months ago

सारांश लेखन
खालील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश शब्दात सारांश लिहा.
___ पुलंचे व्याक्तिमत्त्व हे मोठे गमतीदार आहे; गुंतागुंतीचेही आहे. त्यांना जुन्यातल्या चांगल्याची ओढ
आहे. आधुनिकतेचेही आकर्षण आहे. नवीन विचाराशी ते तादात्म्य पावतात. त्यांची जिज्ञासा दर्दम्य आहे:
वाचन चौफेर आहे. काही तरी झपाटणारे वाचनात आले की, आसपासच्या लोकांना फोन करुन किंवा पत्रे लिहन
त्यात सहभागी करुन घेण्याचा उत्साह आहे. माणुस या गोष्टीत त्यांना अतोनात रस आहे. भरडला जाना-याबद्दल
अस्सल कळवळा आहे. त्यांचे स्वतःचे रागलोभ माणसासारखेच आहेत. पण ते असतानाही त्यांचे साहित्यिक
भान सुटले नाही. नेमाडयांचे पुलंशी फारशे कधी जुळले नाही. पण ती तेढ कोसला च्या रसग्रहणाच्या आड
येत नाही. ते कोसला ची प्रशंसा करु लागले की, त्यांचे तोंड बंद करणे कठीण असते. पु.शि. रेगे व्यक्ती म्हणून
त्यांना कधी आवडले नाहीत. पण पुशिंच्या काव्यावर त्यांचे नितांत प्रेम होते.​

Answers

Answered by AadilAhluwalia
31

पुलंचे व्यक्तिमत्व गमतीदार व गुंतागुंतीचे आहे. त्यांना जुन्या गोष्टीत रस असून आधुनिकतेची जिज्ञासा आहे.

वाचनाची आवड असून त्यांना आवडणाऱ्या लेखकाचे ते भरभरून कौतुक करत. माणसात त्यांना रस असून ते रागलोभ माणसासारखे आहेत. साहित्याची खुप गोडी आहे.

त्यांना रासंग्रहणाची आवड आहे. लेखकांची प्रशंसा करायला लागले तर थांबत नसत. पू.शी.रेगे त्यांना माणूस म्हणून आवडत नसले तरीही त्यांचा कविता पुलं मनापासून वाचायचे.

Similar questions