सार्वजनिक गणेशोत्सव वृत्तांतin marathi
D/OHUU
न
Answers
गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे नियम
मुंबई महापालिका क्षेत्रांतल्या 70 नैसर्गिक विसर्जन स्थळांसोबतच यावर्षी 167 कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावांची ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा पाच पट अधिक आहे.
मुंबई महापालिका विभाग पातळीवरची 'फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्र' सुरू करेल.
नैसर्गिक वा कृत्रिम विसर्जन स्थळांपासून 1 ते 2 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्यांनाचा याठिकाणी विसर्जन करता येईल. इथेही नागरिकांना थेट विसर्जनस्थळावर जाता येणार नाही. लोकांना या विसर्जन स्थळाजवळ मूर्ती जमा कराव्या लागतील आणि नंतर महापालिकेतर्फे या सगळ्या मूर्तींचं विसर्जन करण्यात येईल.
नैसर्गिक वा कृत्रिम विसर्जन स्थळांपासून दूर असणाऱ्यांसाठी महापालिकेचे विभाग संकलन केंद्रं सुरू करतील. इथे जमा करण्यात आलेल्या मूर्तींचंही पालिकेतर्फे विसर्जन केलं जाईल.
कंटेनमेंट झोनमध्ये सोसायटीच्या आवारात तात्पुरती विसर्जनस्थळ तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.