History, asked by srushtiushan, 4 days ago

४. सुर्य आणि सुर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले?​

Answers

Answered by saichavan
7

Answer:

ग्रह तयार होण्याची प्रक्रिया ही तार्यांच्या निर्माण होण्याच्या प्रक्रियेबरोबरच सुरु होते. तारे हे आकारमानाने प्रचंड असलेल्या तेजोमेघांतून तयार होतात. या तेजोमेघांना इंग्रजीमध्ये Nebuleaअसे म्हणतात. या तेजोमेघांमध्ये तुलनेने जास्त घन असलेला भाग हा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेमुळे एका केंद्राभोवती इतका ढासळतो की त्याचे तापमान कोट्यावधी डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते. या वेळेस केद्रकीय सम्मीलन प्रक्रिया सुरु होते. यात तार्यांचा जन्म होतो.

तार्याचे जन्मस्थान असणार्या या तेजोमेघांमध्ये हायड्राेजन आणि हेलियम या हलक्या मुलद्रव्यांबरोबरच कार्बन, औक्सीजन, नायट्रोजन, लोह ही जड मूलद्रव्ये तसेच धूलिकण यांचेही अस्तित्व असते. तार्यांचा जन्म होताना ते स्वत: भोवती फिरु लागतात आणि कालांतराने त्यांच्या भोवती जड मुलद्रव्ये आणि धुलिकण यांची दाट तबकडी तयार होते. तार्याचे स्वत: भोवतीचे परिवलन हळूहळु कमी होऊन त्या तबकडीतील धुलिकण हे अधिक घन असलेल्या भागांकडे गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षित होऊन त्यांचे घन पृष्ठभाग असलेल्या ग्रहांमध्ये रुपांतर होते. तसेच तबकडीतील वायू हे सुद्धा तबक़डीतील घन भागाकडे आकर्षित होतात यातून तयार होणारे ग्रह हे गुरु, शनि , युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांसारखे वायूयु्क्त असतात. ही प्रक्रिया कित्येक कोटी वर्षै चालू असते.

ही ग्रहमालिका निर्मितीची प्रक्रिया सुर्याप्रमाणेच विश्वातील कोणत्याही तार्यासाठी समानपणे लागू होते.

Explanation:

Mark me as brainlist.

Similar questions