सुर्य संपावर गेला तर, सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध, भाषण लेख
Answers
Answer:
सूर्य उगवला नाही तर!! हा विचारच आपण केला नाही पाहिजे.कारण सूर्याचे आपल्या जीवनात फार महत्व आहे.
रोज सकाळी सूर्य उगवतो आणि त्याचबरोबर सकाळची सुरुवात होते.पक्षांची चिचिवाट, कोंबड्याचे आरवणे आपल्याला ऐकू येते.
सकाळ झाली की लोकांची दिनचर्या सुरु होते.काही लोकं जॉगिंग साठी बाहेर निघतात.पोरं शाळा, कॉलेजला जातात.लोकं कामाला जातात.सूर्य उगवला नाही तर,कोणालच आपले काम करता येणार नाही.
सूर्यप्रकाशामुळे झाडांना त्यांचे जेवन बनवता येते व त्यांची वाढ होते.सूर्यप्रकाशामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते व पावसाचे ढग तयार होतात,आणि पाऊस पडतो.सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाचे आरोग्यासाठी बरेच फायदे असतात.सूर्य उगवला नाही तर,या गोष्टी होणार नाहीत. सर्वत्र अंधारच अंधार होईल.वातावरण थंडगार होईल.निसर्गाचा तालमेल बिघडेल.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेता,सूर्य उगवला नाही तर!! हा विचारच आपण मनातून काढून दिला पाहिजे.
Explanation: