India Languages, asked by palsp1324, 1 year ago

वाचाल तर वाचाल मराठी निबंध, भाषण, लेख Vachal tar Vachal Marathi...

Answers

Answered by MannuYadav73
26

Explanation:

सर्वसाधारण लोकांची धारणा असते कि वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट, पण हे साफ चुकीचे आहे. वाचन खूप महत्वाचे आहे, आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात, वाचनाला पर्याय राहिलाच नाही. ज्याने आपने ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुमत नाही. “वाचाल तर वाचाल” याचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपणास पहिल्यांदा काही गैरसमज दूर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साधारण लोक समजतात की वाचन हे शाळा, महाविद्यालयापर्यंत मर्यादित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन इंग्रजी शब्द समजून घ्यावे लागतील, एडुकेशन (Education) आणि लर्निंग (Learning). तसे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले जातात, पण यांत खूप मोठा फरक आहे. एडुकेशन म्हणजे शाळेत, महाविद्यालयात जी एक औपचारिक शिक्षण प्रक्रिया असते, जी एका ठराविक वेळे नंतर थांबते ती. एडुकेशन हे दुसऱ्यांकडून मिळते, म्हणजे शिक्षक, गुरु आदी. त्याच्या परे लर्निंग जन्मापासून मृत्यू पर्यंत चालू राहते. ही अनौपचारिक शिक्षण प्रक्रिया आहे, यात परीक्षा नसते, गुण नसतात. मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो.

Answered by ItsShree44
11

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ वाचाल तर वाचाल!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच दलित-पीडित, गरीब, अशिक्षित, दीनदुबळ्या जनतेला हा संदेश दिला होता- 'वाचाल तर वाचाल!' माणूस शिकला नाही; अशिक्षित राहिला की, त्याची सगळीकडून फसवणूक होते. जमीनदार, सावकार हे सगळे त्याची पिळवणूक करतात. तो सर्वांचा गुलाम होतो.

अशिक्षित माणूस चुकीच्या कल्पना मनात बाळगतो. त्याचे बाळ आजारी पडले, तर त्याला दृष्ट लागली, नजर लागली, असे तो मानतो. साप-विंचू चावला वा कुठली रोगराई आली, तर योग्य औषधोपचार न करता तो वैदू भगत, गंडा, दोरा असे उपाय करत राहतो.

शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करू शकतो. दुसरा कोणीही त्याची पिळवणूक करू शकत नाही. योग्य प्रकारे शिक्षण घेतलेल्या माणसाला योग्य वेतन दयावे लागते. शिकलेले आईवडील आपल्या मुलांना कधीच अशिक्षित ठेवणार नाहीत.ते त्यांचे योग्य संगोपन करतात. आज सारे जग पुढे जात आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की, वाचाल (शिक्षण घ्याल) तर वाचाल (टिकून राहाल)!

Similar questions