" सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण अाहे " हे विधान स्पष्ट करा
Answers
Answer :
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात समाजात विविध क्षेत्रांत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अगदी घरगुती कार्यक्रमांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांत वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सूत्रसंचालन कौशल्य हा व्यवसायाचा एक भाग झाला आहे.
नियोजित कार्यक्रमात प्रेक्षकांपुढे सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी मधून मधून क्रमशः केलेले निवेदन म्हणजे सूत्रसंचालन होय.
यासाठी संबंधित कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका खूप महत्त्वाची असते. कारण संबंधित कार्यक्रमाची संपूर्ण माहिती अगदी प्रमुख पाहण्यापासून ते प्रेक्षकांपर्यंत ची संपूर्ण माहिती कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेली असते. सूत्रसंचालकाला ही संपूर्ण माहिती लक्षात ठेवणे अतिशय कठीण असते. शाळा-कॉलेजमधील स्नेहसंमेलन, ग्रंथप्रदर्शन, साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन, विविध गुणदर्शन स्पर्धा, सत्कार
अशा विविध कार्यक्रमांत विविध प्रकारची माहिती प्रेक्षकांपुढे सादर करावी लागते. कार्यक्रम पत्रिकेत केव्हा आणि कोणता कार्यक्रम घ्यायचा हे निश्चित असते. कार्यक्रम पत्रिके मुळे
सूत्रसंचालन आणि कार्यक्रम यांचा ताळमेळ नीट जुळलेला असतो. सूत्रसंचालन हे संपूर्णपणे कार्यक्रम पत्रिकेवर अवलंबून असते. कार्यक्रम पत्रिकेशिवाय सूत्रसंचालन हे कधीच प्रभावशाली होऊ शकत नाही.
म्हणूनच सूत्रसंचालन करताना कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.....
Answer:
'सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रमपत्रिकेचे महत्त्व अनन्य साधारण आहे' हे विधान खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
कार्यक्रमपत्रिका हे कार्यक्रमाचे प्रतिबिंब कार्यक्रमाला गती देण्याचे कार्य पूर्वतयारी करणे सोपे जाते श्रोत्यांची जिज्ञासा वाढवता येते ताण तणाव येत नाही कार्यक्रमाचा समतोल राखता येतो.