संत तुकारामांनी केलेले कार्य
Answers
Answer:
संत तुकारामांच्या जन्माविषयी लोकांमध्ये अनेक मतभेद आहेत. तुकारामांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या देहू गावात झाला. त्यांच्या जन्माचे वर्ष इ.स. 1568 ते इ.स. 1650 च्या आत सांगितले जाते. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले होते. तुकाराम यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. तुकोबां तीनही भावंडांमध्ये मधले होते. मोठा भाऊ सावजी तर धाकट्या भावाचे नाव कान्होबा होते. तुकोबांचा मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरच होती.
तुकारामांचे वडील कुणबी समाजाचे असल्याने स्वतःचा व्यवसाय व लोकांना उदार पैसे देण्याचे काम करत असत. सोबतच शेतीव्यवसाय देखील करत असत. ते भगवान विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. भगवान विठ्ठलाला विष्णूचे अवतार मानले जाते. नंतरच्या काळात तुकारामांचा विवाह रखमाबाई शी करण्यात आला. रखमाबाई व तुकारामांना एक मुलगा संतू झाला.