India Languages, asked by lokeshsonawane1234, 1 month ago

*(३) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.​

Answers

Answered by jiwoo2341
14

Answer:

'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची तीव्र ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांची वाट पाहणाऱ्या चकोराचा, दिवाळीची वाट पाहणाऱ्या लेकीचा, भुकेसाठी व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत देतात. या सर्व दृष्टांतांपैकी मला भुकेने व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत फार आवडतो.

लहान लेकरू आपल्या सर्व गरजांसाठी आईवरच अवलंबून असते. त्याला भुकेची जाणीव झाली, की ते जोरजोरात रडू लागते. रडून रडून गोंधळ घालते. आपल्या आईच्या प्रेमळ स्पर्शासाठी, दुधासाठी ते आसुसलेले असते. तिची वाट पाहत असते. ही जी भुकेल्या लेकराची आईसाठीची ओढ आहे तशीच तुकाराम महाराजांनाही आपल्या विठूमाऊलीच्या भेटीची ओढ वाटत आहे. अशाप्रकारे, आई व लेकराच्या नात्याद्वारे आपल्या मनातील विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करणारा संत तुकारामांचा हा दृष्टांत मला फार आवडतो.

Explanation:

❥︎hey dear here is ur answer

❥︎plz like rate and mark me as brilliant

❥︎bye tc♡︎

Answered by as6003650
13

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा

'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची तीव्र ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांची वाट पाहणाऱ्या चकोराचा, दिवाळीची वाट पाहणाऱ्या लेकीचा, भुकेसाठी व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत देतात. या सर्व दृष्टांतांपैकी मला भुकेने व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत फार आवडतो.

लहान लेकरू आपल्या सर्व गरजांसाठी आईवरच अवलंबून असते. त्याला भुकेची जाणीव झाली, की ते जोरजोरात रडू लागते. रडून रडून गोंधळ घालते. आपल्या आईच्या प्रेमळ स्पर्शासाठी, दुधासाठी ते आसुसलेले असते. तिची वाट पाहत असते. ही जी भुकेल्या लेकराची आईसाठीची ओढ आहे तशीच तुकाराम महाराजांनाही आपल्या विठूमाऊलीच्या भेटीची ओढ वाटत आहे. अशाप्रकारे, आई व लेकराच्या नात्याद्वारे आपल्या मनातील विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करणारा संत तुकारामांचा हा दृष्टांत मला फार आवडतो.

hope it's helpful

thank you

Similar questions