सेंद्रिय खतांचे शेतीतील महत्व
Answers
Answer:
सेंद्रिय शेती करताना जीवाणू खतांचा वापर
जीवाणूंच्या मदतीने शेतजमीनीत विविध प्रकारच्या क्रिया घडत असतात, जसे की नत्र स्थिरीकरण, स्फुरद आणि पालाश विद्राव्यीकरण, सेंद्रिय पदार्थांचे विघटन इ. परंतु मातीतून दिवसेंदिवस जीवाणूंची संख्या खूपच कमी झाली आहे, ती वाढविण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणे गरजेचे आहे.
i hope, information is helpful...
Answer:
हल्ली सेंद्रिय शेतीबद्दल बरैच ऐकावयास मिळते. अगदी गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत सगळीकडे सेंद्रिय शेती बद्दल चर्चासत्रे / परिसंवाद/ कार्यशाळा सुरू असतात. त्यात मी काही जगा वेगळे न सांगता, यातील बारकावे आणि सेंद्रिय शेती करावयाची पद्धती येणाऱ्या पुढील लेखात सविस्तर सांगणार आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल अजूनही बरेच गैरसमज आहेत. आणि शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करावी याबाबत अपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारा शेतकरी बऱ्याच वेळा नुकसान सोसतो. हेटाळण्यासाठी ही लेखमालिका.
Explanation:
प्रथमलेखात आपण जाणून घेऊया की सेंद्रिय शेती का करावी आणि कोणी करावी?
रासायनिक खतांचा वापर भारतात १९६० नंतर सुरू झाला. त्या आधी भारतात सर्वत्र सेंद्रिय शेती होत होती. स्वातंत्र्यानंतर भारताची सर्वात सूपीक जमीन, सिंधू नदीचा परिसर पाकिस्तानला मिळाला. त्याचा सर्वात जास्त तोटा भारताच्या अन्नधान्य उत्पादनात झाला. भारताला अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. ही टंचाई भरुन काढण्यासाठी भारतात हरित क्रांती घडवून आणली गेली. अशाप्रकारे भारतीय शेतीत रासायनिकखतांचा शिरकाव झाला. रासायनिकखतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हळूहळू शेतकऱ्यांचा रासायनिक खतांच्या वापरावर विश्र्वास निर्माण झाला. आणि त्याच्या परिणामस्वरूप रासायनिक खतांच्या वापराची स्पर्धा शेतकऱ्यांत सुरू झाली. वर्षानुवर्षे सेंद्रिय खतांचा भारतात वापर असल्याने रासायनिक खतांचा दुष्परिणाम दिसून यायला बराच काळ लागला. आणि आता स्पष्टपणे दिसून येत आहे.नापीक होणे:
कोणतेही रासायनिक खत हे जसेच्या तसे पिकाला लागत नाही. सूक्ष्मजीवांद्वारे अथवा इतर घटकांमुळे रासायनिक खतांचे विघटन होते आणि पिकाला घेता येईल अशा प्रकारात (Available Form) ते पिकाला मिळते. सर्वच खत पिकाला लागत नाही. काही खतांचा विघटन न झालेला भाग शेतजमीनीत तसाच राहतो. आणि असा वापर न झालेला भाग जमिनीत असलेल्या इतर मुलद्रव्यांबरोबर संयोग होतो. अशाप्रकारे शेतजमीनीत क्षार तयार होतात. आपण शेतजमीनीच्या वरच्या भागात/पृष्ठभागावर पांढरा रंगाचा पट्टा दिसून येतो. हा पट्टा क्षारांचा तयार झालेला असतो. तितका शेतजमिनीचा भाग हा नापीक होत असतो. पंजाबमध्ये फार मोठा शेतजमिनीचा भाग हा रासायनिक खतांच्या वापरामुळे नापीक झालेला आहे.