संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार किती व कोणते ते लिही
-
Answers
Answer:
आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो . त्या वेळी एकमेकांशी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदा. 'सुर्य उदय झाला' असे न म्हणता 'सुर्योदय झाँआ ' असे आपण सहज
बोलुन जातो.
अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसय्रा शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो . वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी'असे म्हणतात .
"संधी म्हणजे सांधने किंवा जोडणे होय".
संधींंचे प्रकार - १)स्वरसंधी २) व्यंजनसंधी ३)विसर्गसंधी ४)मराठीचे विशेष संधी
1:
स्वरसंधी :- एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यांच्यातील संधीस स्वरसंधी असे म्हणतात .उदा. स्वर - स्वर असे त्याचे स्वरुप असते .
2:
व्यंजन :- संधी होताना जवळजवळ येणाय्रा दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल , तर त्याला 'व्यंजनसंधी' असे म्हणतात। उदा. व्यंजन - व्यंजन किंवा व्यंजन -स्वर असे त्याचे स्वरुप असते.
3:
विसर्गसंधी :- एकत्र येणाय्रा वर्णांतील पहिला वर्ण व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल , तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. उदा. अ - विसर्ग - अः, ई - विसर्ग -ईः.
4:
मराठीचे विशेष संधी :- वाक्यात येणाय्रा शब्दाशब्दांत संधी करण्याकडे संस्कत भाषेची प्रवित्रा अधिक आहे . मराठीचा कल संधी करण्याकडे नाही . मराठीत संस्कत भाषेने जसेच्या तसे आलेले शब्द बरेच आहेत. ते एकत्र आले की त्याना संधी होतो . उदा . काही - असा - काहीसा .
Answer:
१) संधी
संधी :-
आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती ?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो. एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात. एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
२) संधीचे प्रकार
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी :-
जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात.
(स्वर + वर)
उदा.
सूर्य+अस्त = सूर्यास्त
२) व्यंजनसंधी :-
एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.
(व्यंजन + स्वर किंवा व्यंजन).
उदा.
विपद्+काल = विपत्काल
३) विसर्गसंधी :-
एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.
(विसर्ग + स्वर किंवा व्यंजन)
उदा.
मनः +रथ = मनोरथ
Explanation:
Hope it will help you..