साधनांवरुन प्रकार कसे पडतात.
.
Answers
Answered by
0
साधनांवरुन प्रकार:-
इतिहासाच्या साधनांचे मुख्य तीन प्रकार पुढील प्रमाणे :
(१) भौतिक साधने
(२) लिखित साधने
(३) मौखिक साधने
- भौतिक साधने :- भौतिक साधनांचा विचार केला असता भौतिक साधनांमध्ये आपल्या पूर्वजांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येणाऱ्या वस्तू व त्या वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी या वरून त्यांनी उपयोगात आणलेल्या वस्तू कोणत्या काळातल्या असेल याचा अंदाज बांधता येतो. भौतिक साधनांमध्ये मुख्यत: भांडी, दागिने, धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे, घरांचे व इमारतीचे अवशेष विवध प्रकारचे नाणे, मुद्रा, पुतळे, स्मारके इत्यादींचा समावेश होतो. या सर्व साधनांवरून आपल्याला त्या काळातील बरीच माहिती मिळते. रंग व नक्षीदार भांडी दागिने या वरून आपल्याला त्या वस्तू कोणत्या काळातील असतील या गोष्टीचा अंदाज येतो. नाणे, मुद्रा यामुळे आपल्याला त्या काळातील व्यवहार व त्या काळातील शासक राजा महाराजे यांच्या विषयी माहिती मिळते. पुतळे व स्मारके यांपासून आपल्याला त्याकाळातील राजे महाराजे त्या काळातील शासनकर्ते, न्यायव्यवस्था त्यांचे नाव जन्म-मृत्यू नोंद त्यांचे जीवनपट या विषयी आपण माहिती मिळवू शकतो.
- लिखित साधने:- मानवजातीच्या निर्मितीच्या काळात अश्मयुगातील मनुष्याने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व गोष्टी मुख्यत: चित्राद्वारे रेखाटून व्यक्त केल्या आहे व इतरांसमोर मांडल्या आहे. माणसाच्या उत्पत्ती च्या हजारो वर्षानंतर मानवाला लिखित कला अवगत झाली. त्यापूर्वी माणूस प्रतिके, चिन्हे, यांचा वापर करत त्यानंतर त्या प्रतिके आणि चीन्हांपासून मानवाला लिखित कला अवगत झाली. आधुनिक इतिहासात लेखन कामाची कला मानवाला पूर्णपणे अवगत झाली होती त्यामुळे माणूस वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, दस्तावेज, नकाशे, आराखडे या सारख्या गोष्टींचे लेखन करु लागला होता या सर्व लिखाणकामापासून आपल्याला त्यांचे राहणीमान, त्यांची संस्कृती, त्यांची अग्रलेख, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे ज्ञान आपल्याला होते. तसेच त्या काळातील माहिती व इतर सांस्कृतिक, आर्थिक, व राजकीय घडामोडींचे दर्शन आपल्याला होते.
- मौखिक साधने:- मौखिक साधने म्हणजे अशी साधने जी ना कुठे लिहिल्या गेली आहे ना कोणी तयार केली याचा पुरावा आहे ती फक्त एका पिढी पासून दुसऱ्या पिढी ला तोंडी स्वरुपात शिकवल्या आणि पाठ करून देण्यात आली आहे. अश्मयुगीन आणि मध्ययुगीन इतिहासात ओव्या, लोकगीते, लोककथा, बुद्ध व जैन साहित्य, अनेक धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती ही मौखिक साधने म्हणून ओळखली जातात. आधुनिक इतिहासात मानवाला सर्व कला अवगत होत्या त्यामुळे आधुनिक काळातील मौखिक साधनात स्फुर्तीगीते, पोवाडे, दृक-श्राव्य साधने, छायाचित्रे, ध्वनिमुद्रीते आणि चित्रपट या सारख्या आधुनिक साधनांचा समावेश होता
एई था साधनांवरुन का बिभिन्न प्रकार
#SPJ1
Similar questions