Hindi, asked by veananye23, 4 months ago

स्वामीनाथन को ऐसा क्यों लगा कि पिताजी का मिजाज़ खराब होता जा रहा है?​

Answers

Answered by sandeshvt33
0

Answer:

मुलगा - मुलगी समानता

rohit gole | Maharashtra Times | Updated: 22 Jul 2014, 4:02 am

जीवनाचं शिक्षण मिळायला सुरुवात होते ती घरापासूनच. शिक्षणाच्या संस्कारातून मुलाला हळूहळू जग कळायला लागतं. डोळ्यांनी दिसणारं जग, त्या संदर्भात कानावर पडणारं आई-वडिलांचं आणि इतरांचं भाष्य यांचे संस्कार त्या मुलावर कळत नकळत होत असतात; केले जातात.

जीवनाचं शिक्षण मिळायला सुरुवात होते ती घरापासूनच. शिक्षणाच्या संस्कारातून मुलाला हळूहळू जग कळायला लागतं. डोळ्यांनी दिसणारं जग, त्या संदर्भात कानावर पडणारं आई-वडिलांचं आणि इतरांचं भाष्य यांचे संस्कार त्या मुलावर कळत नकळत होत असतात; केले जातात.

समंजस आई-वडील, घरातले इतर सदस्य आणि संवेदनशील शेजारीपाजारी हे जाणीवपूर्वक करत असतात. मुलगा आणि मुलगी एकसमान असतात, त्यांच्यात आईवडिलांनी कसलाही भेदभाव करता कामा नये, असं करणं त्यांच्या आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलांच्या आणि समाजाच्याही निकोप विकासाच्या दृष्टीनं योग्य नसतं, हा विचार गेली काही दशकं भारतातल्या समाजापुढे मांडला जात आहे.

सरकारी जाहिराती ठिकठिकाणी लागलेल्या असतात. रेडिओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रं अशा अनेक प्रकारच्या माध्यमांमधून जनतेला बदलण्यासाठी आवाहन करण्याचे प्रयत्न सातत्यानं चालू असतात. तरीही जोपर्यंत समाजातील आणि प्रत्यक्ष घरातील संस्कार बदलत नाहीत तोपर्यंत मुलांच्यात बदल होणार नाही. केर काढायचा झाला. धुणीभांडी करायची झाली तर भारतीय आई ते काम आपल्या मुलीलाच सांगते, मुलाला कधीही सांगत नाही. मुलासाठी फारशी कामंच नसतात. आयाच असा भेदभाव करतात, तेव्हा समानता कुठून येणार? मुलगा-मुलगी यांच्यात समानता आणायची असेल, तर आधी पालकांना बदलावं लागणार आहे.

या निमित्तानं आठवली जर्मनीतली एक आगळी वेगळी गोष्ट. ती तशी मनावरच कोरलेली आहे. तिथं वाढदिवसाला वा तत्सम समारंभांना मुलालाही बाहुली भेट दिली जात असल्याचं मी अनेकदा पाहिलं आहे. पहिल्यांदा जेव्हा मी असा प्रसंग बघितला, तेव्हा मुलाला बाहुली भेट देणाऱ्या (डॉ.) फ्यॉर्स्टर बाईंना मी त्याबद्दल विचारून माझं आश्चर्य व्यक्त केलं. तेव्हा त्या बाईंनी आपली बाजू मला समजावून सांगितली. त्या म्हणाल्या, ‘मुलामुलींची खेळणी भिन्न करून आपण त्यांना असमान बनवतो. मुलगाही पुढे बाप होणार असतो. मग बाळावर प्रेम करण्याचं, त्याला कडेवर घेण्याचं, दूध पाजण्याचं, गाणं म्हणून झोपवण्याचे संस्कार मुलावरही व्हायला हवेत.’ पूर्वी जर्मनीत आणि एकूण युरोपातली परिस्थिती सध्याच्या भारतासारखीच होती. मुलींना ढीगभर काम सांगणाऱ्या आणि मुलाचे फाजील लाड करणाऱ्या आयाच असायच्या. आयाच आपल्या सख्ख्या मुलींवर अन्याय करतात. पुढे सुदैवानं दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात परिस्थिती बदलली आणि मुला-मुलींच्यात बरीचशी समानता आली, या इतिहासाची उजळणीही या बाईंनी केली. मी त्यांना कधीही विसरू शकणार नाही.

मुलांच्या निकोप वाढीच्या दृष्टीनं मला ही पद्धत एकदम अनुकरणीय वाटते. आपल्याकडे एखाद्या मुलांना बाहुली पाहिजे म्हटल्यास सारे जण त्याला रागावून विचारतात, की ‘तू काय मुलगी आहेस का?’ एखाद्या मुलानं कोणाची बाहुली घेतलीच, तर त्याची आई शरमिंदी होते. तिला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं! त्याच्या आईवडिलांना आपल्या मुलात काही विकृती आहे की काय असंही वाटायला लागतं.

मात्र, मुलगा-मुलगी हा भेदभाव नष्ट करण्यासाठी या आणि अशाच काही मार्गांचा अवलंब करायला पाहिजे, असं राहून राहून वाटतं.

- प्रा. अविनाश बिनीवाले

Similar questions