India Languages, asked by Rasika4321, 1 year ago

स्वच्छ भारत अभियान निबंध in marathi

Answers

Answered by michaeljohnjohn85
6
/भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहिम सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये, भारत सरकारने “संपूर्ण स्वच्छता अभियान” सुरू केले जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे “निर्मल भारत अभियान” असे नामकरण केले. परंतु, स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. यातून त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबविली आणि नागरिकांना भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, काहींना हा राजकीय स्टंट वाटू शकतो, पण यासर्वातून एक फायदा झाला की आपण भारतीय लोक स्वच्छतेबद्दल बोलू लागलो. वादविवाद, चर्चा होऊ लागली. स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्याच्या निगडित कामांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे आणि दिवसेंदिवस मोहिमेची प्रगती होत आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेची स्वतःची अधिकृत वेबसाइट व अॅप आहे जेथे आपण या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. आतापर्यंत १ ,४०८ ,२८० घरांत शौचालये बांधली गेली, १४३,४९१ गावे/ ७९ जिल्हे / ३ राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. विविध राजकारणी, सेलिब्रिटिज, अभिनेते आणि क्रीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता आणि पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन, अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि असेच अनेक जणांनी झाडू हातात घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या या अभियानाचा एक चांगला प्रचार केला. या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये, तसेच शहरांत स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.

Rasika4321: thanks a lot
Similar questions