स्वच्छता अभियान मराठी निबंध
Answers
Answer:
can you please translate to English
Answer:
✨✨स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध |
स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहिम भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. प्रधान मंत्रींनीं २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा एक मुख्य ध्येय आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे “ओपन डेफकेशन फ्री” म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. या स्वच्छ भारत अभियान भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे हे सुद्धा आहे.
विद्यार्थी म्हणून आपण स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेचे फायदे असे विषय भाषण आणि निबंध स्पर्धांमध्ये पाहू शकता. काळजी करू नका! स्वच्छ भारत अभियान या विषयावर आम्ही येथे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत . या लेखातील, आम्ही स्वच्छ भारत अभियान बद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे ती तीन भागात विभागली आहे. प्रथम, आम्ही आपल्याला स्वच्छ भारत मोहिमेबद्दल महत्वाची माहिती आणि डेटा देऊ. मग आपण याची अंमलबजावणी कशी झाली आणि काय परिणाम झाले हे सुद्धा पाहू. आणि शेवटी, आपण या विषयावर निष्कर्ष काढू. येथे, आम्ही आपल्याला मुख्य माहिती देत आहोत जी आपण नंतर भाषण, निबंध किंवा परिच्छेद स्वरूपात अनुरूप करण्यासाठी सुधारू शकता आणि आम्हाला माहित आहे की आपण असे बदल करण्यासाठी पुरक आहात. तर, चला जाणून घेऊयात स्वच्छ भारत अभियान चे महत्व, फायदे… मी स्वच्छते साठी काय करू शकते / शकतो? मराठी निबंध २५० शब्द भाषण परिचय भारत आणि पाश्चात्य देशांमधील एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता, त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत कशी?, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो, नाही का? आपण खूप मागे आहोत, लवकरच आपल्याला काहीतरी पावले उचलावी लागतील. आजच्या भाषणाचा विषयही तोच आहे. शुभ प्रभात, आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमेबद्दल बोलणार आहे, आणि ती म्हणजे “स्वच्छ भारत अभियान”. स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध | स्वच्छतेचे महत्व, फायदे माहिती भारत सरकारचा स्वच्छ भारत मोहिम सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये, भारत सरकारने “संपूर्ण स्वच्छता अभियान” सुरू केले जे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे “निर्मल भारत अभियान” असे नामकरण केले. परंतु, स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली. आपल्या शपथविधीमध्ये सौच आणि स्वच्छता वरती बोलणारे ते जगातील पहिलेच नेते असावेत. यातून त्यांची स्वच्छतेबद्दलची आवड आणि संकल्प ही दिसतो. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबविली आणि नागरिकांना भाग घेण्यास आवाहन केले. त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, काहींना हा राजकीय स्टंट वाटू शकतो, पण यासर्वातून एक फायदा झाला की आपण भारतीय लोक स्वच्छतेबद्दल बोलू लागलो. वादविवाद, चर्चा होऊ लागली. स्वच्छ भारत अभियानाने भारतातील स्वच्छता आणि त्याच्या निगडित कामांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे आणि दिवसेंदिवस मोहिमेची प्रगती होत आहे. स्वच्छ भारत अभियान मोहिमेची स्वतःची अधिकृत वेबसाइट व अॅप आहे जेथे आपण या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतो. आतापर्यंत १ ,४०८ ,२८० घरांत शौचालये बांधली गेली, १४३,४९१ गावे/ ७९ जिल्हे / ३ राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. विविध राजकारणी, सेलिब्रिटिज, अभिनेते आणि क्रीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि या अभियानाची क्षमता आणि पोहोच वाढवून दिली. सचिन तेंडुलकर, कमल हसन, अनिल अंबानी, विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि असेच अनेक जणांनी झाडू हातात घेतला आणि रस्ते साफ केले. मोदींच्या या अभियानाचा एक चांगला प्रचार केला. या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये, तसेच शहरांत स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.