(७) स्वमत
(अ) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.(आ) ‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांतसांगा.
Answers
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""सोनाली"" या पाठातील आहे. लेखक डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनी हिंस्र प्राणी माणसाप्रमाणे उत्कटपणे प्रेम करू शकतात हे प्रस्तुत पाठात सिद्ध करून दिले आहे.
★ स्वमत
(अ) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा.
उत्तर- सोनालीचा दिपालीवर खूप जीव होता. एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशंट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर चवताळून त्याच्यावर धावली. या प्रसंगातून सोनालीच्या मनातील प्रेमाची भावना दिसून येते.
(आ) ‘पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो.'
उत्तर- माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आमच्याकडे गायी आहेत. गायीचे दूध काढण्यासाठी तिचे वासरू सोडून तिच्यासमोर उभे केले जाते कारण तसे केल्याने गायीला असे वाटते की वासरू दूध पित आहे आणि म्हणून गायी शांत उभी राहते. अशाच पद्धतीने मी वासरू सोडून गायी समोर उभे केले आणि मी गायीचे दूध काढू लागलो. परंतु माझे लक्ष नसताना वासरू तिथून सुटले आणि मी दूध काढतच राहिलो. आणि गायीने लगेच लाथ मारत उड्या मारू लागली. या प्रसंगावरून पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो हे दिसून येते.
धन्यवाद...
"
Explanation: