स्वमत:
पुस्तकांची वाट पाहण्याची गंमत लेखिकेच्या अनुभवाच्या आधारे
स्पष्ट करा.
Answers
Answer:
लेखिका अरुणा ढेरे यांचा 'वाट पाहताना' हा पाठ खूप काही शिकवून जातो. वाट पाहण्यातील आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींचे मिश्रण लेखिकेने आपल्यासमोर मांडलेले आहे. खरतर मलाही वाटते पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण जगाची ओळख होते. जगातील प्रत्येक देशाची, समाजाची, धर्माची वेगवेगळी संस्कृती आणि त्या संस्कृतीतील वेगवेगळ्या छटांची ओळख आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून होते. पुस्तक हे माणसांवर संस्कार करत असतात. आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करत असतात. पुस्तकांच्या माध्यमातून जगातील वेगवेगळ्या गोष्टींचे असणारे वेगळेपण आपल्या लक्षात येते. वेगळे राहणीमान,वेगळे कपडे, वेगळी भाषा, वेगळा इतिहास, भौगोलिक वेगळेपण या सर्व गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात आणि याचे श्रेय जाते ते, ते पुस्तक लिहिणार्या लेखकांना. त्या लेखकांच्या अमाप वैचारिक शक्ती मुळेच आपल्याला घरी बसून जगाचे दर्शन होते, म्हणून लेखिकाही पुस्तकांची सुट्ट्यांमध्ये वाट पाहत असते.