World Languages, asked by 7fr11dhanashreebk, 6 months ago

स्वमत - शहरातून पक्ष्यांची संख्या कमी का झाली ? याविषयी तुमचे मत मांडा.​

Answers

Answered by BRAINLYBILALFAROOQ
28

Answer:

रस्ता रूंदीकरण व शहर विकासामुळे झालेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईल टॉवर्सची वाढती संख्या अशा कारणांमुळे शहर परिसरातील पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचा निष्कर्ष 'नेचर क्लब ऑफ नाशिक'ने केलेल्या पाहणीतून दिसून आला. तसेच चिमण्या व कबुतरांच्या संख्येवर याचा कुठलाही बदल झाला नसल्याची सुखद बाबही यातून पुढे आली.

नेचर क्लब संस्थेतफेर् रविवारी पहाटे 'चला पक्षी मोजूया' उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रा. आनंद बोरा यांच्यासह वन्यजीव निधीचे माजी अधिकारी निशाद नहाटा, पक्षीमित्र सुजीत जाधव, निसर्गमित्र भास्कर शेरे आदींसह पक्षीप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शहरात कुठल्या पक्षांची संख्या वाढली अथवा कमी झाली, कोणते नवीन पक्षी दाखल झाले अथवा कोणते पक्षी दुमिर्ळ झाले, हिवाळ्यातील स्थलांतरीत पक्षांचे प्रमाण कसे आहे, अशा विविध बाबी जाणून घेण्याचा या उपक्रमामागील हेतू होता.

गाडगे महाराज धर्मशाळेपासून या उपक्रमाची सुरुवात झाली. या ठिकाणी बगळ्यांची वस्ती आढळून आली. तीन वर्षांपूवीर् याच ठिकाणी तीनशे ते चारशे बगळे, पाँड हेरॉन अशा पक्षांची मोठी वस्ती होती. आता हे प्रमाण शंभरावर आले असल्याची धक्कादायक बाबही या पाहणीतून दिसून आली. बहुतांश नाशिककर आपल्या अंगणात धान्य व पाणी ठेवत असल्याने कबुतर व चिमण्यांची संख्या कायम असल्याची, तसेच शहरात लालबुड्या बुलबुल मोठ्या संख्येने वाढल्याची सुखद बाबही यानिमित्ताने पुढे आली.

शहरातील विविध बागबगीचा, घराजवळील लहान उंचीच्या झाडांत अवघ्या दोन फूटांवर लहान आकाराच्या पक्ष्यांनी घरटी बांधल्याचे दिसून आले. घारपुरे घाटावजळील झाडांच्या छाटणीमुळे बगळ्यांच्या एका वसाहतीने स्थलांतर केले आहे. वाढते शहरीकरण, रस्ता रूंदीकरणामुळे झालेली झाडांची बेसुमार कत्तल, मोबाईल टॉवर्सची वाढती संख्या अशा कारणामुळे शराटी व घारीचे प्रमाण कमी होत असल्याचे या पाहणीतून दिसून आले. गोदापार्कजवळ नदीत पॉण्ड हेरॉन पक्षी मोठ्या प्रमाणात दिसले.

या उपक्रमात पक्षीमित्रांनी तब्बल ६० ते ७० विविध जातीच्या पक्ष्यांची नोंद केली. त्यात धनेश, खाटीक, सातभाई, सनबर्ड, घार, कोतवाल, रॉबिन, पोपट, गप्पीदास, पाणकावळे, खंड्या, जंगली मैना, धोबी, तांबट, रामगंगा, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, फ्लाय कॅचर, ग्रास बर्ड, तसेच काही पाणपक्षांचा समावेश आहे. या उपक्रमात एका झाडावर तीनशे ते चारशे पोपटांची वसाहतही आढळून आली. पर्यावरणदृष्ट्या पक्ष्यांचे मोठे महत्त्व असल्याने, पक्षी वाचवणे व त्यांची संख्या वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

......................

जळगावमध्येही पक्षीगणना

म. टा. वृत्तसेवा । जळगाव

Explanation:

PLEASE MARK AS BRAINLIST ANSWER

Answered by HanitaHImesh
12

शहरात पक्ष्यांची संख्या खालील कारणांमुळे कमी होत आहे -

  • शहरांमधील वाढत्या मानवी लोकसंख्येमुळे जंगलतोड होत आहे आणि त्यामुळे पक्ष्यांसाठी राहण्याची जागा कमी होत आहे.
  • अधिवासाचा नाश (वस्ती, वृक्षतोड, प्राणी आणि एकल-पीक शेती आणि आक्रमक वनस्पतींच्या विकासाद्वारे).
  • अन्न, खेळ आणि पाळीव प्राण्यांच्या व्यापारासाठी पक्ष्यांची शिकार करणे आणि पकडणे.
  • हवामान बदल आहे – ज्याने स्थलांतरित पक्ष्यांवर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आमूलाग्र बदल करून प्रभावित केले आहे.
  • मोबाईल नेटवर्क टॉवर हे पक्ष्यांच्या घटतेचे एक मोठे कारण आहे. अशा टॉवर्समधून येणाऱ्या किरणांचा पक्ष्यांवर फार वाईट परिणाम होतो ज्यामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
  • शेतात पिकांवर वापरली जाणारी रासायनिक खते हे देखील घट होण्याचे एक कारण आहे. जेव्हा पक्षी अशी पिके खातात, तेव्हा ते जे अंडी घालतात त्यांना खूप पातळ कवच असते जे बाळाच्या परिपक्वतापूर्वी तुटते.

#SPJ3

Similar questions