स्वमत-
तमचा छंद कोणता ते सांगून तो जोपासण्यासाठी तुम्ही काय करता ते लिहा.
Answers
Explanation:
तुमचा छंद काय आहे? त्यातून मिळणारा आनंद तुम्ही शब्दात व्यक्त करू शकता का?
चित्र काढणे…. आणि चित्र काढतांना मला मिळणारा आनंद मी शब्दातुन व्यक्तच करू शकत नाही…
जी चित्रं मला मनापासुन काढावीशी वाटतात तीच मी काढते.
मला बऱ्यापैकी चित्र काढता येत असल्यानं मला offers पण येतात परंतु मला माझ्या छंदाचा व्यवसाय करायला अजिबात आवडत नाही.
खरं तर छंदाचा व्यवसाय करण्यात काही गैर नाही, पण मी तसं केलं तर त्यातला रस गमवून बसेल याची भीती वाटते.
'छत्रपती' या शब्दाबद्दल काय सांगू शकता?
तुमचा आवडता छंद कोणता आहे?
मराठी भाषेतील तुमचा आवडता शब्द कोणता? का?
आवड आणि छंद यामधे कोणता सुक्ष्म फरक आहे?
तुमचा आवडता छंद काय आहे ?
मला क्वलिंग (Quilling) हा कलाप्रकार करायला खूप आवडतं. क्विलींग साठी 'पेपर फिलिग्री' ही संज्ञा सुद्धा वापरल्या जाते. ह्यात कागदाच्या अरुंद पट्ट्या गोल गुंडाळून त्यांना आकार देऊन निरनिराळ्या आकृती बनवल्या जातात. हे आकार आपण शुभेच्छापत्रे, कागदी दागिने, छायाचित्रांच्या चौकटी इ. सजावटीच्या वस्तूंसाठी वापरू शकतो. मी हा कलाप्रकार स्वतः शिकून घेतला आणि अजूनही त्यातील नवीन नवीन कौशल्ये शिकत आहे .
मी हे गेल्या ७ वर्षां पासून करत आहे . मागच्या ३ वर्षांपासून मी स्वतः तयार केलेल्या वस्तू मित्र-मैत्रिणीं मध्ये आणि नातेवाईकांमध्ये मध्ये विकायला सुरुवात केली. मला या कला प्रकाराची साधना करताना आनंद तर वाटतोच पण क्विलींग करणं हे माझ्यासाठी एक प्रकारची ध्यानधारणा आहे. यासाठी मी कागद उचलला की एक वेगळी ऊर्जा माझ्यात संचारते. ते निरनिराळे रंगीत कागद मला जग विसरायला लावतात. मी डोळे बंद करून सुद्धा हे करू शकते.
जेव्हा कधी मी बनवलेली क्विलींगची वस्तू विकल्या जाते, तेव्हा मला माझातला एक अंश माझ्यापासून दूर चाललाय असं वाटतं. पण ह्या गोष्टीचा आनंद असतो की ते कलेचं प्रतिक कुणाच्या तरी आयुष्यात आनंद देत राहील.
माझी इच्छा आहे की, एक दिवस लोकांना ताण-तणाव मुक्तीचे एक माध्यम म्हणून हा कलाप्रकार सर्वांसाठी सर्वांपुढे ठेवावा व सर्वांना शिकवावा.
या वेडेपणाला छंद म्हणा किंवा आणखी काही, हे मी सर्वस्वी तुमच्यावर सोडते.