Math, asked by ghotekaryogesh73, 1 year ago

स्वप्ने नसतील तर निबंध मराठी​

Answers

Answered by sanjeevaarav910
16

Answer:

सर्वसाधारण लोकांची धारणा असते कि वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट, पण हे साफ चुकीचे आहे. वाचन खूप महत्वाचे आहे, आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात, वाचनाला पर्याय राहिलाच नाही. ज्याने आपने ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुमत नाही. “वाचाल तर वाचाल” याचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपणास पहिल्यांदा काही गैरसमज दूर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साधारण लोक समजतात की वाचन हे शाळा, महाविद्यालयापर्यंत मर्यादित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन इंग्रजी शब्द समजून घ्यावे लागतील, एडुकेशन (Education) आणि लर्निंग (Learning). तसे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले जातात, पण यांत खूप मोठा फरक आहे. एडुकेशन म्हणजे शाळेत, महाविद्यालयात जी एक औपचारिक शिक्षण प्रक्रिया असते, जी एका ठराविक वेळे नंतर थांबते ती. एडुकेशन हे दुसऱ्यांकडून मिळते, म्हणजे शिक्षक, गुरु आदी. त्याच्या परे लर्निंग जन्मापासून मृत्यू पर्यंत चालू राहते. ही अनौपचारिक शिक्षण प्रक्रिया आहे, यात परीक्षा नसते, गुण नसतात. मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. एडुकेशन महत्वाचे आहेत, पण लर्निंग खूप महत्वाचे आहे. आणि दोन्ही मध्ये प्रगती करण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. एडुकेशन आपणास गणित, विज्ञान, समाजशाश्त्र आदी शिकवते, नोकरी मिळवण्यास मदत करते. पण लर्निंग आयुष्य जगायला शिकवते, आनंदी राहायला शिकवते. नोकरी आयुष्यात महत्वाचा भाग आहे पण नोकरी पलीकडे पण खूप काही शिकावे लागते. चार लोकांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलावे, इंटरनेट वापराने, बिल भरणे, जागा, घर नावावर करणे, योगा, डाएट, बँक, कर व्यवहार अश्या हजार गोष्टी शिकाव्या लागतात. आणि या शाळेत शिकवल्या जात नाहीत, त्यासाठी वाचन करावेच लागते. किंवा कोणी तज्ज्ञ व्यक्तीकडून ते अर्जित करावे लागते. पण असे तज्ज्ञ दरवेळी मिळतीलच असे नाही, त्यामुळे वाचन हे करावे लागतेच. आत्ताच्या तांत्रिक प्रगतीमुळे “वाचाल वर वाचाल” या म्हणीचा अर्थच बदलला आहे. जेव्हा ही म्हण प्रचलित झाली तेव्हा माहिती किंवा ज्ञान वाटपाचे नेमकेच प्रकार होते. मुख्य म्हणजे शाब्दिक प्रकार, पुस्तक, कादंबरी आदी च्या रूपात. आजच्या डिजिटल क्रांतीने ज्ञान वाटपाचे नव-नवीन प्रकार सादर केले आहेत. आज ज्ञान हे इमेजेस, विडिओ, इन्फोग्राफिक्स, चार्ट्स, ऍनिमेशन, सिम्युलेशन, वर्चुअल रिऍलिटी च्या माध्यमात प्रसारित केले जाते. त्यामुळे वाचन म्हणजेच ज्ञानार्जन खूप सोपे झाले आहे, आता वाचनालयात जावे लागत नाही; सर्व काही मोबाईल फोन वर मिळते. आताच्या जगात फक्त वाचनापर्यंत मर्यादित राहून जमणार नाही, मिळालेल्या ज्ञानावर विचार, मनन केले पाहिजे आणि त्याच्यावर अमल सुद्धा केले पाहिजे. मिळालेले ज्ञान वाटले पाहिजे,त्याने ते वाढते; त्यावरती कृतीही केली पाहिजे. वाचनासाठी नवीनतम सोयी आता उपलब्ध आहेत, आणि आजच्या बदलत्या आणि माहिती प्रधान जगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाहीच. वाचाल तर वाचाल या पेक्षा मी तर म्हणेन “वाचाल तरच वाचाल”. You can also read this related english article – Importance of Reading in Our Life. and माझा आवडता छंद वाचन सूचना: वर दिलेला निबंध आम्ही थोड्या वेगळ्या प्रकारे लिहण्याचा प्रयत्न केला आहे, जर आमचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या आर्टिकल ला ५-स्टार रेटिंग देऊ शकता. Liked the Post? then Rate it Now!! [Total: 400 Average: 4.1] marathi वाचाल तर वाचालवाचाल तर वाचाल – मराठी निबंध by Sueniel2018-09-26 वाचाल तर वाचाल हा तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे. खूप साऱ्या निबंध पुस्तकांत या वर निबंध मिळतील, आणि आता तर वाचाल तर वाचाल मराठी निबंध इंटरनेट वरही मिळतील. आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला थोडा वेगळा निबंध देण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा करतो तुम्हाला आवडेल. आवडला तर ५-स्टार रेटिंग नक्की द्या.

Similar questions