India Languages, asked by Tejasvidalvi2024, 1 month ago

स्वप्न पूर्ण कारणे म्हणजे काय ​

Answers

Answered by padmadeshmukh05
46
  1. ध्येय पूर्ण करणे
  2. खूप प्रयत्न करणे
Answered by rajraaz85
4

Answer:

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वप्न बघत असते. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असते.

स्वप्न पूर्ण होणे म्हणजे आपली इच्छा पूर्ण होणे. आयुष्यामध्ये ठरवलेले ध्येय पूर्ण होणे म्हणजेच स्वप्नपूर्ती होय. स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती आयुष्यभर धडपडत असते. सतत तेच विचार डोक्यात चालू असतात. एकच लक्ष असते माझे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. मी बघितलेले स्वप्न वास्तवात उतरले पाहिजे. अशा विचारांचा कल्लोळ मनात चालू असतो.

स्वप्नांसाठी दिवस-रात्र मेहनत करणे, कष्ट करणे, स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी व्यक्ती जीवाचा आटापिटा करत असते. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात स्वप्न बघितले पाहिजे. आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. स्वप्न पूर्ण झाल्यावरचा आनंद हा जगावेगळा असतो.

Similar questions