स्वत:चे एक आदर्श व्यक्तिमत्व निबंध मराठी मधे
Answers
Answer:
प्रस्तावना:
आदर्श नागरिक ही देशाचीसर्वात मोठी संपत्ती आहे. जर देशातील नागरिक हे आदर्श आणि सभ्य असतील तर देशाचाच विकास होऊ शकतो. एक आदर्श नागरिक हा एक सर्वात प्रथम एक आदर्श व्यक्ती असतो.
तसेच आदर्श नागरिक हा आपल्या समाजाचा पाया आणि गौरव असतो. आदर्श नागरिकांकडे अनेक गुण असतात. आदर्श व्यक्तीची वागणूक ही केवळ दुसऱ्या व्यक्ती बरोबर असणारा व्यवहार आणि देशासाठी असलेले प्रेम यातून दिसून येते.
आदर्श नागरिक हा प्रत्येक देशाचा आधार आणि सौंदर्य असते. त्याच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल देशप्रेम असते.
आदर्श नागरिक हा आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो. त्याला आपल्या देशाबद्दलच्या त्याच्या कर्तव्याची त्याला जाणीव असते. तसेच आदर्श नागरिक हा नेहमी आपल्या देशाच्या विकासासाठी कोणतेही कार्य करण्यास तत्पर असतो.
आदर्श नागरिकाचा अर्थ –
आदर्श नागरिक म्हणजे एक देशवासी ज्याचा व्यवहार देशातील लोकांच्या हितामध्ये असतो.
ईमानदारीची भावना
आदर्श नागरिकांमध्ये अनेक गुण असतात. आपल्या देशाचा विकास करण्यासाठी ईमानदारी असणे खूप गरजेचे आहे. एक आदर्श नागरिकांमध्ये ईमानदारीची भावना असते. एक आदर्श नागरिक हा ऑफिसचे काम असो किंवा अन्य कोणत्याही कामामध्ये ईमानदारी बाळगतो.
सुशिक्षित आणि जागरूक
एक आदर्श नागरिक हा सुशिक्षित आणि जागरूक असतो. आदर्श नागरिक हा आपल्या देशातील लोकांचे आणि देशाचे भले करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आदर्श नागरिकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना ही भरलेली असते.
संकटाच्या वेळी सुद्धा तो आपल्या मातृभूमीसाठी आपले प्राण देण्यास सुद्धा तयार होतो. सर्वांसोबत मिळून राहणे, गरीब लोकांना मदत करणे आणि कल्याणकारी वृत्ती ही एखाद्या चांगल्या आदर्श नागरिकाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.
देशाच्या समृद्धीसाठी योगदान
एक आदर्श नागरिक हा लोकांच्या हित हेच आपले हित मानतो. एक आदर्श नागरिक हा सहनशील, संयम ठेवणारा, खरे बोलणारा, कष्टाळू असतो.
तो कोणावरही भार ठेवत नाही. तो स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाचे पालन – पोषण करतो तसेच देशाच्या समृद्धीसाठी आपले महत्वपूर्ण योगदान देतो.
नैतिक आणि धार्मिक
एक आदर्श नागरिक हा अन्याय, हिंसाचार, बेईमानी, फसवणूक, भ्रष्टाचार इ सर्व गोष्टींना विरोध करतो. आदर्श नागरिक हा खरोखरच नैतिक आणि धार्मिक असतो. तो सर्व धर्मांचे आणि पंथांचे पालन करतो. तो इतर धर्माच्या आणि पंथातील लोकांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो.
शिस्तेचे पालन
एक आदर्श नागरिक हा नेहमीच आपल्या इच्छेनुसार शिस्त पाळतो. तो आपल्या कर्तव्यांबद्दल नेहमी सतर्क असतो.
आदर्श व्यक्ती हा सहिष्णुता, आत्मविश्वास आणि देशभक्ती दर्शवितो. आदर्श नागरिक हा देशाच्या सर्व नियमांचे पालन करतो.
आदर्श व्यक्ती हा आपल्या स्वार्थासाठी कधीच कार्य करत नाही. आदर्श नागरिकाचे मुख्य लक्षण हे त्याचा देश आनंदी आणि समृद्ध करणे हाच असतो.
आदर्श नागरिक
आपल्या भारत देशामध्ये असे काही महान व्यक्ती होऊन गेलेत. जसे की महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, शिवाजी महाराज इ अनेक महान व्यक्ती आज या जगामध्ये नाही आहेत.
परंतु आपल्या देशासाठी ते एक आदर्श नागरिक होते. त्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केले आहे ते कार्य अन्य कोणीही करू शकत नाही. म्हणून एक आदर्श नागरिक बनण्यासाठी या आदर्श व महान पुरुषांचे सर्वगुण प्राप्त केले पाहिजेत. तेव्हा आपण एक आदर्श नागरिक बनू शकतो.
निष्कर्ष:
देशातील प्रत्येक व्यक्तीने एक आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच देशाबद्दलची आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी.
प्रत्येक व्यक्तीने अहिंसा करू नये आणि कोणत्याही संकटाच्या वेळी लोकांची मदत केली पाहिजे. आपण आपली संस्कृती ही टिकवून ठेवली पाहिजे आणि आदर्शवादी झाले पाहिजे. जेव्हा देशातील सर्व लोक हे एक आदर्श नागरिक बनतील तेव्हाच आपला देश महान बनू शकेल.
plz mark me brainlist