India Languages, asked by Keesan44, 10 months ago

स्वयंचलित यंत्र की माहिती मराठी में

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

स्वयंचलित यंत्रमाग बसवल्यामुळे विणकराचे काम सोपे आणि कमी झाले. त्यामुळे त्याला अधिक यंत्रमाग चालवायला देणे शक्य झाले. साधा यंत्रमाग असताना जो विणकर चार यंत्रमाग चालवायचा, त्याला स्वयंचलित यंत्रमाग असल्यावर १६ ते २४ यंत्रे चालवायला देता येऊ लागली. ही संख्या त्या यंत्रावर चालवल्या जाणाऱ्यात कापडाच्या प्रकारानुसार ठरवतात.प्रत्येक विणकर जास्त यंत्रे चालवत असल्यामुळे उत्पादन वाढते. त्यामुळे दर मीटरमागे उत्पादन खर्च कमी होतो. त्यामुळे नफ्यात वाढ होते. सध्या सर्वच उद्योगात असलेली स्पर्धा लक्षात घेतली तर गुणवत्ता चांगली असणारा उद्योग पुढे जातो. स्वयंचलित यंत्रमागाला सूताचा दर्जाही चांगला लागतो. त्यामुळे स्वयंचलित यंत्रमागावर तयार होणारे कापड गुणवत्तापूर्ण होते. त्याचा पुढील परिणाम म्हणजे निर्यातीसाठीचे कापड स्वयंचलित यंत्रमागावर विणले जाते. जागतिक स्पध्रेत ते फायदेशीर ठरते. स्वयंचलित यंत्रमागाची रचनासुद्धा मजबूत केलेली असल्यामुळे मोडतोडीचे प्रमाण कमी असते. त्याचाही उत्पादन वाढायला हातभार लागतो. विणकराचा कामाचा बोजा कमी झाल्यामुळे आणि स्वच्छता, टापटीप याकडे अधिक लक्ष दिल्यामुळे पण कार्यक्षमतेत वाढ झालेली आहे.याच कारणाने स्वयंचलित यंत्रमागाचे प्रमाण साध्या यंत्रमागाच्या तुलनेत इतर देशांत जास्त आहे. इंग्लंड, अमेरिकेत हे प्रमाण १०० टक्के आहे तर चीन, जपानमध्ये ६० ते ७० टक्के आहे. भारतात मात्र हे प्रमाण जेमतेम २५ टक्के आहे. या यंत्रमागाची भांडवली किंमत जास्त आहे. ही यंत्रे वापरल्यावर होणारी कामगार कपात युनियनला मान्य नाही. इत्यादी कारणांमुळे भारतात हे प्रमाण कमी आहे. इथे आपल्या देशाला सुधारणा करायला वाव आहे. या यंत्रमागावर तयार होणारे कापड दोषरहित असते. त्यामुळे भारतातही निर्यातीसाठीचे बहुतेक कापड अशाच यंत्रमागावर विणले जाते. टप्प्याटप्प्याने हे उत्पादन वाढत आहे, हे चांगले प्रगतीचे लक्षण आहे. भारताला कापडाच्या निर्यातीला जो वाव आहे, या यंत्राच्या वापरामुळे साध्य होऊ शकतो. आपल्याकडे विणकरांची संख्या मुबलक आहे. त्यांना या यंत्रावर काम करणे थोडय़ाशा प्रशिक्षणानंतर, सहज शक्य होईल. आपल्याकडे असलेल्या या विशिष्ट मनुष्यशक्तीचा उपयोग करायला हवा. देशहिताच्या दृष्टीने ते करणे गरजेचे आहे.

Similar questions