Social Sciences, asked by aamish4604, 1 year ago

संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा.
क्र.
१. आमसभा.
२. सुरक्षा समिती
३. आंतरराष्ट्रीय न्यायालय
४. आर्थिक व सामाजिक परिषद

सदस्य संख्या
१ .......................
२ ........................
३ ........................
४........................

कार्ये
१ .......................२ ........................३ ........................४........................

Answers

Answered by gadakhsanket
18

★उत्तर - संयुक्त राष्ट्रांच्या घटकशाखांविषयीचा पूर्ण केलेला तक्ता.अनुक्रमे

क्र शाखा

१) आमसभा

२) सुरक्षा समिती

३) आंतरराष्ट्रीय न्यायालय

४) आर्थिक व सामाजिक परिषद

क्र सदस्य संख्या

१) प्रत्येक। सदस्य राष्ट्रांचे पाच

प्रतिनिधी, मत मात्र एकच देता

येते.सध्या १९३सदस्य आहेत.

२) ५अस्थायी व १०अस्थायी असे

एकूण १५सदस्य

३) १५ न्यायाधीश

४) ५४ सदस्य

क्र कार्ये

१) * पर्यावरण, वंशभेद अशा प्रश्नावर

आमसभेत चर्चा करून ठराव संमत

करणे

* सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची

निवड करणे.

*संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व आंतरराष्ट्रीय

न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे.

* संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे.

२) * आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता

राखणे.

*शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार

करणे.

* आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त

राष्ट्रांचे महासचिव यांची निवड करणे

३) * सदस्य देशामधील तंटे सोडवणे.

* आतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ

लावणे.

* संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायदयाशी संबंधित

प्रश्नावर सल्ला देणे.

४) *दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व

सामाजिक विषमता या प्रश्नावर

चर्चा करणे,व उपाययोजना करणे.

*स्त्रियांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण,

मानवी हक्क मूलभूत स्वातंत्र्य,

जागतिक व्यापार,आरोग्यविषयक

समस्या अशा प्रश्नावर चर्चा करून

निर्णय घेणे.

* आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य करणे.

* संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संघटनांच्या कामात सुसुत्रता व समन्वय राखणे.

धन्यवाद...

Answered by reenakhandelkar2
2

Answer:

1st is the correct answer

Similar questions