History, asked by shatayuakare121, 11 months ago

सियाउद्दीन वरनी
बखर ​

Attachments:

Answers

Answered by varadad25
2

Answer:

झियाउद्दीन बरनी यांनी लिहिलेली बखर : तारीख-इ-फिरुजशाही

Explanation:

बखर:

१. 'बखर' या शब्दाचा अर्थ हकीकत किंवा सत्यता असा होतो.

२. पूर्वीच्या काळात मराठी भाषेवर फारसी भाषेचा प्रभाव होता.

३. फारसी शब्द 'खबर' याचेच मराठीत 'बखर' असे रूपांतर झाले.

४. बखर हा लवकरच ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जाऊ लागला.

५. पानिपत येथे झालेल्या युद्धावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक बखरी लिहिलेल्या आहेत.

६. बखरीत त्या काळातील परिस्थितीचे वर्णन केलेले असल्याने त्या त्या काळातील इतिहास समजण्यास मदत होते.

७. बखरींमध्ये आलंकारिक भाषा वापरली जाते. तसेच काही वेळा सुभाषिते, काव्यपंक्ती यांचाही वापर करून बखर अधिक प्रभावी केली जाते.

काही महत्त्वपूर्ण बखरी व त्यांचे विषय:

१. सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद - छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन

२. भाऊसाहेबांची बखर - भाऊसाहेब - पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन

३. होळकरांची कैफियत - मल्हारराव होळकर - होळकरांच्या घराण्याचे वर्णन

४. राजतरंगिणी - कल्हण - काश्मीरचा इतिहास

Attachments:
Similar questions