Geography, asked by pilluaditya40, 6 months ago

sagari बेट म्काजे काय

Answers

Answered by py517673
5

Explanation:

जलवेष्टित भूभागाला बेट असे म्हणतात. इंग्रजीत मोठ्या बेटाला ‘आइलंड’ तर अगदी लहान बेटाला बहुधा ‘आइल’ किंवा ‘आइलेट’ असे संबोधिले जाते. तथापि ब्रिटिश बेटांबाबतही अनेकदा ‘आइल्स’ ही संज्ञा वापरली जाते. बेटाचा आकार लहानमोठा असू शकतो. ऑस्ट्रेलिया हेही एक बेटच आहे, परंतु भूगोलज्ञ त्याचा समावेश खंडात करतात. जगात ग्रीनलंडसारखी मोठी, त्याचप्रमाणे अनेक लहानसहान बेटेही आढळत असून त्यापैकी काही बेटे अजूनही निनावी आहेत.

खंडांप्रमाणेच मोठ्या बेटांवरही (उदा. न्यूझीलंड ब्रिटिश बेटे) पर्वते, पठारे, मैदाने इ. सर्व प्रकारची भूमिस्वरूपे आढळतात. काही बेटांची उंची कमी असते, तर काही बेटे मात्र समुद्रपातळीवर इतक्या कमी उंचीची असतात की लहानसहान लाटांमुळेही संपूर्ण बेट पाण्याखाली जाते. बेटांच्या समूहाला द्वीपसमूह म्हणतात. उदा., अंदमान व निकोबार, वेस्ट इंडिज, जपान, फि‌लिपीन्स इ. समुद्र, महासागर यांशिवाय नदी, सरोवर, दलदल यांमध्येही बेटे निर्माण झालेली आढळतात. बेटाभोवतीचे पाणी खारे,गोडे किंवा मचूळ असते.

बेटांची निर्मिती अनेक प्रकारांनी होत असते. उदा., भूकवचातील हालचालींमुळे काही भूभाग खचल्याने अगर समुद्रतळ वर उचलला गेल्याने, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने, ज्वालामुखी क्रियेमुळे किनाऱ्यानजीक गाळाच्या भरीने ‌वा समुद्रात प्रवाळखडकांची निर्मिती होऊन ते जलपृष्ठावर उंचावले गेल्यामुळेही लहानमोठ्या बेटांची निर्मिती होते. बेटांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते.

बेटांची रचना व संरचना यांनुसार बेटांचे वर्गीकरण करता येते. निर्मितीनुसार केलेले बेटांचे वर्गीकरण अधिक ग्राह्य धरले जात असले, तरी ते परिपूर्ण नाही; कारण कित्येक बेटांच्या निर्मितीविषयी अजून अज्ञानच आहे. काही वेळा एकाच बेटाच्या निर्मितीच्या अनेक शक्यता दिल्या जातात. उपखंड बेटे, सागरी बेटे, अंतर्गत बेटे, भू-बंध बेटे, ज्वालामुखी बेटे, प्रवाळ बेटे, प्लवमान बेटे असे बेटांचे विविध प्रकार आढळतात. स्थानानुसार केलल्या वर्गीकरणात उपखंड बेटे व सागरी बेटे हे दोन प्रमुख प्रकार संभवतात.

Similar questions