सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...... दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
Answers
Answer:
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.प्रतिध्वनी. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
Answer:
वरील काव्यपंक्ती च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गायले आहे. छत्रपती शिवाजीराजांनी सह्याद्री पर्वताच्या कायद्याची मराठा साम्राज्य उभारले. सह्याद्री पर्वत म्हणजे शिवाजी राजांचा प्राण होता कारण या सह्याद्री मुळेच शिवाजी राजांनी अनेक लढाया जिंकल्या.
शिवाजी राजांच्या पराक्रमाची साक्ष सह्याद्रीचा प्रत्येक डोंगर आणि शिखर देतो. त्यामुळेच कवी शिवाजी महाराजांना सह्याद्री चा सिंह म्हणतात. हा सह्याद्रीचा सिंह जेव्हा गर्जतो तेव्हा मोगल साम्राज्यातील प्रत्येक सेनापती राजांना घाबरतो.
शिवाजी राजांचा आवाज सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून घुमतो कारण शिवाजीराजे हे महाराष्ट्राची शान आहेत असे कवी म्हणतो. महाराष्ट्राला मराठी भूमी म्हणून जपून ठेवण्यासाठी शिवाजी राजांनी आपल्या आयुष्य पणाला लावले.