"sainikache aatmavrutt "essay in marathi
Answers
“मी, शंकर पवार, शपथ घेतो की भारताच्या सौर्वभौमत्वाचे आणि भारताच्या हद्दीचे रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ते काम मी पुर्ण निष्ठा आणि विश्वासाने करीन. देशाच्या राष्ट्रपतींनी आणि माझ्या कमांडरने दिलेल्या आज्ञांचे पालन करीन आणि त्यासाठी जमीन, सागरी किंवा हवाई मार्गाने कुठेही जायची माझी तयारी आहे”
रणांगणावर घायाळ होऊन पडलेल्या हवालदार शंकर पवारच्या मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शप्पथ जागी झाली होती. हुतात्मा वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवुन तो सैन्यामध्ये भरती झाला होता आणि आज लढताना शत्रुच्या एका गोळीने त्याचा वेध घेतला होता. जखमी होऊन तो खाली कोसळला पण तपुर्वी त्याने ३ शत्रुच्या सैनीकांना यमसदनी धाडले होते.
असहाय्य, निर्जन स्थळी तो मदतीची वाट पहात पडला होता. जखमेतुन वहाणारे रक्त आणि क्षीण होत जाणारी शक्ती त्याची चिंता वाढवत होती. मृत्युचे भय त्याला नव्हते. सैन्यात भरती होतानाच त्याने मृत्युला आपलेसे केले होते. पण त्याला चिंता होती ती त्याच्या परीवाराची. त्याची वृध्द आई आणि पत्निची
hope it will help u can u please mark it brainliest