सकारण स्पष्ट करा : ( 1 )प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला
Answers
Answer:
प्लासीची लढाई जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.
ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला.
Explanation:
प्लासीच्या लढाईच्या वेळी सिराज-उद-दौला बंगालचा राज्यकर्ता होता. त्यांनी ब्रिटिशांना देशासाठी धोकादायक मानले. इंग्रजही त्याला घाबरत होते. मृत्यूपूर्वी त्यांचे आजोबा अलिवर्दी खान म्हणाले होते - "देशातील युरोपियन राष्ट्रांच्या सामर्थ्यावर लक्ष ठेवा. जर देवाने माझे वय वाढवले असते, तर मी तुलाही या भीतीपासून मुक्त केले असते - आता माझ्या मुला, तुला हे काम करावे लागेल ."
प्लासीची लढाई हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा १७५७ मध्ये बंगालचा नवाब व त्याच्या फ्रेंच मित्रराष्ट्रांवर निर्णायक विजय होता. सिराज-उद-दौलाने इंग्रजांना तटबंदी थांबविण्यास सांगितले होते जे युद्धाचे एक कारण बनले. रॉबर्ट क्लाइव्हने सिराज-उद-दौलाचे कमांडर-इन-चीफ मीर जाफर यांना पुढील नवाब बनविण्याची लाच दिली ज्यामुळे मीर कासीमकडून विश्वासघात झाला आणि इंग्रजांचा विजय झाला.
आणखी एक कारण म्हणजे -
- रॉबर्ट क्लाइव्हने नवाबाचे सरसेनापती मीर जाफर आणि बंगालमधील श्रीमंत बँकर्स यांच्याशी कट रचला होता •
- सिराज-उद-दौलाचे सैनिक कठोर लढा देत होते परंतु ते नेतृत्वहीन आणि दिशाहीन होते.