Geography, asked by tejaspunase51, 8 days ago

समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात?​

Answers

Answered by abinsam2161
5

Answer:

सोशल कॉन्फ्लिक्ट). ही एक सर्वव्यापी वैश्विक नैसर्गिक घटना ( यूनिव्हर्सल फिनॉमिनन ) असून तिची बीजे सामाजिक असंतोषात रुजलेली आढळतात. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे; मात्र संघटनात्मक व विघटनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रेरणा माणसामध्ये दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सद्गुण असतात, तद्वतच काही दुर्गुणही असतात. या दुर्गुणांमुळे (राग, लोभ, मत्सर) त्याची वृत्ती संघर्षमय होते. सामान्यतः समाजात विविध व्यक्ती आणि समूह परस्परसमाधानकारक अशा पायावर आपल्या संबंधांचे समायोजन करीत असतात. जेथे स्पर्धा आणि संघर्ष मोठ्या प्रमाणावर चालू असतो, अशा आधुनिक समाजात परस्परविरोधाची प्रक्रिया नेहमीच प्रत्ययास येते. आर्थिक, धार्मिक, राजकीय,सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या भूमिकांतून विरोध होत असतो, असे दिसून येते. एकाच व्यक्तीच्या अंतरंगात किंवा कुटुंबातसुद्घा अहम् ( इगो ) दुखविला गेल्यामुळे परस्परविरोधी अशा निष्ठांचा संघर्ष होऊ शकतो. सामाजिक संबंधांतून जर हा संघर्ष होत असेल, तर ती एक सामाजिक प्रक्रियाच म्हणावी लागेल. सहकार्य हीसुद्घा एक सामाजिक प्रक्रियाच आहे. सहकार्याच्या सामाजिक प्रक्रियेत विविध व्यक्ती आणि सामाजिक गट कोणताही संघर्ष न करता एकत्रितपणे विशिष्ट कार्य करीत असतात;मात्र जेव्हा त्यांच्या हितसंबंधांना आव्हान दिले जाते किंवा विरोध होतो, तेव्हा संघर्ष उद्भवतो. परस्परविरुद्घ अशी उद्दिष्टे, ध्येये,प्रवृत्ती, भावना ही जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर जागृत होतात, त्यावेळी सामाजिक संघर्ष उद्‌भवतात. तो समाजातील दोन वर्गांत, गटांत, भिन्न राजकीय प्रणालींत वा पक्षांत तसेच भिन्न धर्मियांमध्ये, भिन्न जाती, भिन्न वर्णांत आणि संघटनांतर्गत गटागटांत-संप्रदायांत आढळतो. समूहात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सामाजिक संघर्ष अटळ ठरतो. सामाजिक संघर्षाची कारणे अनेक आहेत; तथापि सामूहिक असंतोष, द्वेष, सुडाची भावना ही प्रमुख व मूलभूत होत.

दरोडा, सामूहिक बलात्कार, लूटमार इ. कृत्ये एकट्यादुकट्या व्यक्तीने शक्यतो केली जात नाहीत; तर त्यामध्ये संघटित प्रयत्न असतात. या सामाजिक संघर्षाच्या काही वैयक्तिक घटना असल्या, तरी त्यांतून स्वार्थलोलूप व्यक्तींची विकृत मानसिकता दिसून येते. सामाजिक संघर्षाची समूहात्मक उदाहरणे अनेक आहेत. भिन्न मतप्रणाली असणाऱ्या राजकीय पक्षांची सत्ता हस्तगत करण्यासाठी सदैव धडपड चाललेली असते. मतभिन्नतेतून किंवा पक्षापक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण होऊन संघर्ष उद्‌भवतो. कधीकधी निदर्शने किंवा तात्त्विक मतभेदांचे रू पांतर हाणामारीत होते. काही वेळा पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण होऊन दोन गटांत संघर्ष निर्माण होतो आणि पक्षाच्या एकजुटीला तो बाधक ठरतो. हीच गोष्ट भिन्न धर्मियांच्या बाबतीत घडते. हिंदू , जैन, बौद्घ, इस्लाम, पारशी, ज्यू, नवबौद्घ, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्मीयांत सामान्यतः सामंजस्य आढळते आणि सहकार्याची भावना दृष्टोत्पत्तीस येते; परंतु एखादी धार्मिक घटना ( उदा., धर्मसुधारणा आंदोलन, धर्मांतर, पॅलेस्टाइनचे स्वामित्व, अयोध्येतील राममंदिर

Similar questions