समानाथी of आवड in marathi
Answers
Answer:
आवड या शब्दाचा समानार्थी शब्द छंद असा होऊ शकतो.
Answer:
आवड या शब्दाचा समानार्थी शब्द रुची किंवा गोडी आहे.
Explanation:
समानार्थी शब्द:
प्रत्येक भाषेतील शब्दांना एक अर्थ असतो. व त्याच भाषेत अजून दुसरे असे काही शब्द असतात की त्यांचा अर्थ ही तोच असतो. अशा सारख्या अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.
पृथ्वी या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत. धरा, धरणी, अवनी, वसुधा, भू.
तसेच फुल या शब्दाचे कुसुम, पुष्प, सुमन हे समानार्थी शब्द आहेत.
समानार्थी शब्दांमुळे एका विशिष्ट अशा शब्दाला न वापरता त्याऐवजी आपण त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरू शकतो.
उदाहरणार्थ-
सूर्याच्या तेजामुळे पृथ्वीला नवचैतन्य आले.
या वाक्यातील सूर्या या शब्दा ऐवजी आपण भास्कर हा शब्द देखील वापरू शकतो.
भास्कराच्या तेजामुळे पृथ्वीला नवचैतन्य आले.
म्हणून भास्कर हा शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.