Hindi, asked by rubasri1202, 1 year ago

Samaj seva hi Ishar ki seva hai essay in hindi

Answers

Answered by chavhansimranpd53r8
1
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या संताच्या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली होती. स्वामी विवेकानंदांनी देखील दीनदुबळ्या समाजाचा उद्धार हे ध्येय समोर ठेवून कार्य केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून नागपूर महापालिका व पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिटय़ूट विकलांगांना आधार देण्यासाठी व त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी साहित्य व साधने वितरित करीत आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

सर्व शिक्षा अभियानांतर्गत अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमातून संदर्भीत झालेल्या शून्य ते १८ वयोगटातील १४० विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य व साधने शनिवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित समारंभात गडकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. यावेळी आमदार विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे सभापती नरेंद्र बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, अपर आयुक्त हेमंतकुमार पवार, शिक्षण समिती सभापती चेतना टांक, शिवसेना पक्षनेत्या शीतल घरत, कर आकारणी समितीचे सभापती प्रा. गिरीश देशमुख, दुर्बल घटक समिती सभापती सविता सांगोळे, महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी जिचकार, सुमित्रा जाधव, मुरलीधर मेश्राम, लता यादव, सुरेश राव, डॉ. विरल कामदार, विजयकुमार सूद, डॉ. खापर्डे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, अपंगत्व कुणावर येऊ नये. गरिबीमुळे अपंगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शहरात कॅटरॅक्टचे प्रमाण वाढले आहे. हे शहर कॅटरॅक्टमुक्त करण्याचा निर्धार करू या. 

देहदानाप्रमाणे दृष्टीदानाची देखील चळवळ चालवली पाहिजे. त्यादृष्टीने माधव नेत्रपेढी चांगले कार्य करत आहे. गरीब लोकांना डायलिसीसची सोय कमी खर्चात यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आणखी दोन केंद्र सुरू करण्याची सूचना करून शहरातील सरकारी रुग्णालयांचा अभ्यास करून या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी डॉ. मिलिंद माने यांनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. महापौर प्रवीण दटके यांनी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी तर दीपेंद्र लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक, अपंगांचे पालक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Similar questions