samarth bharat essay in marathi
Answers
...
Hope it helped u
समर्थ भारत
भारत भूमी सुमारे १५० वर्ष इंग्रजांच्या गुलामीमध्ये होती. अथक प्रेयत्नांनंतर आणि अनेकांचा प्राणाची आहुती दिल्यानंतर भारत स्वबळावर स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. भारताचे नाव त्रिखंडात मानाने घेतले जाते. क्रीडा असो वा अवकाश यात्रा, भारताने सगळ्यांना मागे टाकून आपली ओळख निर्माण केली आहे.
भारत आज समर्थ देशांमध्ये एक अंकला जातो. भारताची कीर्ती विश्वात विख्यात आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या देशात अनेक लोक निरक्षर होते, पण आता साक्षरता घराघरांत पोहोचली आहे. आधी गावांमध्ये वीज नव्हती, पण आता अनेक गावं विजेने चमकत आहेत. आधी शेती करणे हा मूळ रोजगार होता, पण आता अनेक व्यवसाय लोकांना रोजगार देत आहे. कृषिप्रधान देश असल्यामुळे आपले जास्तीत जास्त धान्य आपल्याच देशात पिकतं.
आज बघता बघता भारताने अवकाशात झेप घेतली आहे. चांद्रयान २ च्या भाररिने भारताचे नाव थेट चांद्रपर्यंत नेले आहे. साऱ्या जगात नावलौकिक झाले आहे आपल्या देशाचे.
निसर्गाचीही खूप कृपा आहे भारत भूमीवर. पाणी, धान्य , झाडं, फळं, फुलं, प्रणी आणि अनेक अशा नैसर्गिक आशीर्वादाने भारत समृद्ध आहे.
भारत प्रत्येक रूपात समर्थ आहे. आपला देश ह्यापुढे असाच प्रगती करत राहावा अशी आशा प्रत्येक भारतीय माणसाला आहे.
जय हिंद.