India Languages, asked by ishaagrawal8640, 1 year ago

Samudra kinara essay in marathi ​

Answers

Answered by halamadrid
0

■■ समुद्रकिनारा■■

समुद्रकिणाऱ्यावर वेळ घालवायला मला खूप आवडते. त्या समुद्रासमोरच्या वाळूवर बसून समुद्राकडे पाहत राहण्यात मजाच वेगळी आहे. समुद्राच्या पाण्याचा आवाज, तिथे वाहणारी थंड हवा, तिकडचे वातावरण हे सगळे काही माझे मन वेधून घेते.

मी बऱ्याच वेळा माझ्या कुटुंबीयांसोबत वेगवेगळ्या समुद्रसमुद्रकिणाऱ्यावर फिरायला जाते. काही दिवस आगोदरच मी माझ्या आईसोबत गिरगाव समुद्रकिणाऱ्यावर गेलेले. हा समुद्रकिणारा मुंबईमध्ये प्रसिद्ध असून याला गिरगाव चौपाटी म्हणून ओळखले जाते.

हा समुद्रकिणारा फारच सुंदर आहे. इथे प्रत्येक वयोगटातील लोक वेळ घालवायला येतात. लोकांची गर्दी नेहमीच इथे पाहायला मिळते. इथे पानी पूरी, पाव भाजी आणि इतर खायच्या वस्तू विकणारे बरेच ठेले आहेत. तसेच खेळणी, फुगे, चहा विकणारे लोकं समुद्रकिणाऱ्यावर फिरत असतात.

या समुद्रकिणाऱ्यावर असलेले शांत,स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणमुळे लोक इथे येतात. आपल्या मित्र- मैत्रिणी व कुटुंबीयांसोबत बराच वेळ घालवतात.इथे येणाऱ्या सगळ्या लोकांना खूप आनंद मिळते.

Similar questions