sanganak Maza Mitra nibandh Marathi
Answers
संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे .
आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिक्षेप टाकुया .*फायदे*१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याची तसेच सग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .
*उपयोग*आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे .२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .३) संगणकाचा उपयोग करुन आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो 5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .
Answer:
संगणक आजच्या काळाची गरज आहे.संगणक विज्ञानाची मानवजातीसाठी मौल्यवान भेट आहे.एका मित्रासारखा संगणक आपल्याला खूप मदत करत असतो.
एका चांगल्या मित्रासारखा संगणक माझी अभ्यासात व कामात मदत करतो.संगणकामुळे मला माझ्या अभ्यासात खूप मदत होते,कोणतीही शंका आल्यास,एखादा विषय न समजल्यास,संगणक मला योग्य ते उत्तर देतो,विषय नीट समजवतो.
संगणकामुळे मला माझे काम वेगाने व अचूकपणे करता येते.तो माझ्या वेळेची बचत करतो.संगणकामधील इंटरनेट सुविधेमुळे मला घरबसल्या माझ्या जवळच्या लोकांशी संपर्क साधता येते,वीडियो कॉलच्या सुविधेमुळे आपल्या नातेवाईकांना व मित्रांना प्रत्यक्षात पाहता येते.संगणक आपल्याला विविध विषयांची,गोष्टींची माहिती देतो.संगणकामध्ये प्रचंड माहिती जपून ठेवता येते.
मला कंटाळा आल्यास तो एका चांगल्या मित्रासारखा माझे मनोरंजन करतो.त्याच्यामध्ये मी गेम खेळू शकते,चित्रपट पाहू शकते,गाणी ऐकू शकते.
खरंच, संगणक वेगवेगळ्या प्रकारे माझी मदत करून माझा एक चांगला डिजिटल मित्र आहे.
Explanation: