सर्जनशीलतेचे घटकांचे सविस्तर विशद करा
Answers
सर्जनशीलता : (क्रिएटिव्हिटी). सर्जनशीलतेच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असले, तरी तिची सुस्पष्ट आणि सर्वांना मान्य होईल अशी व्याख्या करता आली नाही आणि तिच्या मूल्यमापनाचे प्रयत्नही वादग्रस्त ठरले आहेत तथापि सर्जनशीलतेचे काही निकष सामान्यतः मान्य झालेले आढळतात. ज्ञानसंपादन आणि प्रेरणा या क्षेत्रांतील मानसशास्त्रीय प्रयोगांनी कृतीला उत्तेजन देणारे नावीन्याचे सामर्थ्य स्पष्ट केले आहे. साहित्य, कला, विज्ञानादी क्षेत्रांत होऊन गेलेल्या किंवा असलेल्या सर्जनशील प्रतिभावंतांच्या जीवनांतूनही ह्या निकषांचा प्रत्यय मिळतो. ह्या निकषांपैकी एक म्हणजे सर्जनशील व्यक्तींची विचार करण्याची पद्धत सर्वसामान्य माणसांच्या चाकोरीबद्ध विचारपद्धतीपासून भिन्न असते, त्यामुळे भोवतालच्या परिस्थितीला त्यांच्याकडून मिळणारे प्रतिसादही नवे, वेगळे असतात. अनेक नवनव्या, अनोख्या कल्पना त्यांना सुचत असतात. ह्या कल्पना एखादया अनिर्बंध प्रवाहाच्या वेगाने त्यांना सुचत असल्यामुळे कल्पनांचा अस्खलितपणा त्यांच्या ठायी असतो.