History, asked by adityajivade, 2 months ago

सरासरी आयमान म्हणजे काय?​

Answers

Answered by parthrb123
0

Answer:

सरासरी आयुर्मान : कोणताही लोकसमूह अनेक व्यक्तींचा समूह असतो. त्या समूहातील एखादी व्यक्ती किती वर्षे जगेल, हे जरी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सांगता येणे शक्य नसले; तरी त्या समूहाच्या मृत्युमानात बदल झाला नाही, तर त्यातील व्यक्ती सरासरी किती वर्षे जगण्याची शक्यता  आहे याचा निष्कर्ष काढता येतो. अशा निष्कर्षास त्या समूहातील व्यक्तीचे सरासरी आयुर्मान (अ‍ॅव्हरेज एक्स्पेक्टेशन ऑफ लाइफ) असे म्हणतात. हे आयुर्मान कोणत्याही विशिष्ट वयाच्या व्यक्तींच्या बाबतीत काढता येते व साहजिकच निरनिराळ्या वयाच्या व्यक्तींच्या बाबतीत ते निरनिराळे असते. हे आयुर्मान सरासरी असल्यामुळे त्यावरून त्या वयाची विशिष्ट व्यक्ती नेमकी किती वर्ष जगेल, हे निश्चितपणे समजू शकणार नाही. प्रत्येक वयोगटाचे मृत्युमान त्या गटाच्या सरासरी आयुर्मानात प्रतिबिंबित झालेले असते; परंतु या मृत्युमानात भविष्यकाळात होणारे बदल आयुर्मानाच्या आकड्यात आढळून येत नाहीत.

Similar questions
Math, 30 days ago