India Languages, asked by sheetalrwts8119, 9 months ago

sathyaprathinja abdul ek thor samaj sevak in marathi in narrator speech

Answers

Answered by vinodkumar68968
6

Answer:

बाबा आमटे हे एक थोर समाजसेवक होते. बाबा आमटे याचं खरं नाव मुरलीधर देवीदास आमटे. या थोर पुरुषाचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 26 डिसेंबर 1914 रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. आमटे परिवार समृद्ध असल्यामुळे बाबांच बालपण खुप सुखात गेलं.

बाबांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे पूर्ण केलं. त्यांनी नागपूर विद्यापीठातून 1934 मध्ये बी. ए व 1936 मध्ये एल. एल. बी ही पदवी घेतली. खरं तर बाबांना डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती परंतु वडीलांच्या आग्रहा खातर ते वकिल झाले. काही काळापर्यंत त्यांनी वकिली केली.

त्या काळात कृष्ठरोग हे मागील जन्माच्या पापाचं फळ समजलं जात होतं. त्यामुळे जर कुणाला कृष्ठरोग झाल असेल तर त्याचा बहिष्कार केला जात असे. बाबांनी एकदा पावसात भिजणारा एक कुष्ठरोगी पाहीला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासाला सुरुवात केली. बाबांनी कुष्टरोगा सारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करण्याचे कठिन कार्य स्वीकारले. आणि 1952 मध्ये त्यांनी चंद्रपूर जिल्यातील वरोडा जवळ “आनंदवन” नावाच्या आश्रमाची स्थापना केली. आनंदवन आश्रम हे 3500 कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. कुष्ठ रोग्यांसाठी उपचार, त्यांत प्रशिक्षण आणि पुनर्वसन याकरिता बाबांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. कृष्ठरोग्यांच्या शैक्षणिक विकासासाठी महाविद्यालयाची ही स्थापना केली. प्रौढ व अपंगां साठी सुतारकाम, हातमाग, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला व त्यांना आत्मनिर्भर बनवले.

गांधीजींच्या सेवाग्राम येथील आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र प्राप्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. बाबांचा निडर स्वभावाबद्दल जाणून घेतल्यावर गांधीजींनी बाबांना “अभय साधक” अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी 1985 साली ‘भारत जोडो’ अभियान योजले. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग घेऊन बाबांनी संपूर्ण 12 वर्षे नर्मदा नदी काठी मुक्काम करून आंदोलनाला पाठबळ दिले होते.

त्याना अनेक राष्ट्रीय व अंतरार्ष्ट्रीय पुरस्कार दिले गेले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राईट लाइव्हलीहुड पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण इत्यादि काही पुरस्कारांची नावं आहेत. त्यांनी अनेक साहित्य, कविता आणि पुस्तके लिहीली.

या महान समाज सेवकाचा  9 फेब्रुवारी 2008  मध्ये वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने (blood cancer) मुळे निधन झाले

make. me. brainlist.

Similar questions