speech given by rani lakshmi bai in marathi
Answers
Explanation:
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोहेंबर १८ ३५ रोजी झाला. पेशव्यांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य मोरोपंत तांबे यांचि एकुलती एक कन्या मनुबाई होती. मोरोपंतांच्या पत्नीचे नाव भागरथीबाई होते.ती अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, विदुषी आणि धार्मिक वृत्तीची होती. मनुबाई अश्या आदर्श जोडप्याची मुलगी होती. तिचे कपाळ भव्य होते. डोळे टपोरे, व चेहरा राजबिंडा व तेजस्वी होता. मनुबाई जेमतेम चार वर्षाची होत नाही तर तिची आई मरण पावली. मुलीच्या पालनपोषनाची सर्व जबाबदारी वडिलांवर आली औपचारिक शिक्षणा बरोबर तिला तलवार फिरविणे, घोड्यावर स्वार होणे तसेच बंदुक चान्विणे याचे हि शिक्षण मिळाले.सन १८४२ मध्ये झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्या बरोबर तिचा विवाह झाला. १९ व्या शतकाची ती सुरवात होती.भारता मध्यर व्यापार करायला आलेल्या इंग्र्जानी ईष्ट इंडीया कंपनिच्या नावावर अत्यंत जोमाने राजकीय सत्ता बळकावयाला आरंभ केला होता. भारताच्या दृष्टीने घडणारी प्रयेक दुर्दैवी गोष्ट त्या काळी ब्रिटीसांच्या साम्राज्य विस्ताराला साह्यभूतच होत असे. इंग्रजांशी जे काही ठ झाले त्यात प्रत्येक वेळी नुकसानीचे भागीदार भारतीय होते.
१८५१ मध्ये महाराणी लक्ष्मीबाई याना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने त्या मुलाचा तीन महिन्याच्या आतच मृत्यू झाला. गंगाधररावांना राज्याच्या भविषाची चिंता पडली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला त्यांच्या दुखा:चे आणखी एक कारण होते. त्या वेळचा गव्हर्नर जनरल लार्ड डलहौसी याचे प्रशासन अतिशय क्रूर होते. काही राज्यांनी इंगरजांच्या मदतीचा स्वीकार केला होता.त्या बदल्यात त्यांच्या वर अशी एक अट लादली, कि जो राजा पुत्रा शिवाय मरेल त्याचे राज्य खालसा होऊन इंगरजी साम्राज्यात विलीन होईल. एवढेच नव्हेतर राज्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा राज्य करण्याचा अधिकार राहाणार नाही.१८५३ साली महाराज आनि राणी यांनी एका मुलाला दत्तक घ्यायचे ठरविले. धार्मिक विधी नुसार दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव दामोधरराव ठेवण्यात आले. काहीच दिवसांनतर २१ नोहेंबर १८५३ साली गंगाधररावांचे निधन झाले. अगदीच अनुभव नसलेली राणी लक्ष्मीबाई १८ व्या वर्षीच विधवा झाली.एकीकडे लॉर्ड डलहौसी राज्य बळकावन्याच्या तयारीत तर दुसरी कडे लहान दामोधर! लक्ष्मीबाई अश्या कठीण अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या दुखा:ला व संकटांना तोड नव्हती.