Saur bamb information in marathi
Answers
Answer:
आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब. म्हणजेच सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पुढील काळात ही यंत्रणा मोफत सेवा देते.
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!
सौर बॉम्ब:
सौर ज्वालाग्राही सूर्यप्रकाशात अचानक वाढलेल्या चमकाचा एक फ्लॅश असतो जो सामान्यत: त्याच्या पृष्ठभागाच्या जवळपास आणि सनस्पॉट ग्रुपच्या नजीक साजरा केला जातो. सामर्थ्यशाली ज्वाळे बर्याचदा असतात परंतु नेहमीच नसतात, त्यायोगे कोरोनल मास इजेक्शन देखील असते. एकूण सौर विकृतीमध्ये अगदी सर्वात शक्तिशाली फ्लेअर्स अगदी शोधण्यायोग्य असतात.
पॉवर-लॉ स्पेक्ट्रमच्या विशालतेमध्ये सौर flares उद्भवतात; सामान्यत: 10 चे उर्जा प्रकाशन उर्जा 20 ज्युल्स उर्जामध्ये स्पष्टपणे देखण्यायोग्य घटना तयार करण्यासाठी पुरेसे असते, तर एक प्रमुख इव्हेंट 10 पर्यंत उर्जा 25 जूल पर्यंत उत्सर्जित करू शकते.